तुळजाभवानी मंदिर संस्थान मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करा : अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीची मागणी
तुळजापूर प्रतिनिधी : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथील मागे झालेल्या भरती प्रक्रियेची किती लोकांची भरती झाली व किती लोक रूजु करून घेतले व त्यात कांही लोक वाढले आहेत काय याची माहिती तसेच भरती प्रक्रियेत काही भ्रष्टाचार झालेले दिसून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे मंदिर संस्थान यांना दिनांक 25 मार्च रोजी सदर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे कर्मचारी भरतो करिता वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यानुषंगाने कर्मचारी भरती करण्यात आली आहे. परंतु आवश्यकतेपेक्ष्या जास्त कर्मचारी भरती करण्यात आलेले असल्याचे समजते. तरी चौकशी करून यावर सविस्तर कार्यवाही करण्यात यावी. तसेच या भरती प्रक्रियेतून ज्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली त्यांच्याकडुन प्रत्येकी रु. दोन लाख डिपॉझीट म्हणुन अनाधिकृतरित्या घेण्यात आल्याचे झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या बातमीमध्ये दाखवण्यात आले. तेंव्हा जाहिरातीमध्ये किती कर्मचारी भरण्याचा उल्लेख केलेला होता व प्रत्यक्षात किती लोक भरण्यात आले याची माहिती देण्यात यावी. तसेच संबंधीत कर्मचाऱ्यांकडुन कोणत्या नियमानुसार रू.२ लाख डिपॉझीट घेण्यात आले त्याची माहिती मिळावी. तरी विनंती की, सदर भरती प्रक्रियेत कांही भ्रष्टाचार झालेला दिसुन आल्यास वरीष्ठांमार्फत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आली असून या निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश गणेश पाटील ,सारिका चुंगे,दत्ता सोनवणे,बाळासाहेब पाटील यांची स्वाक्षरी आहे .
तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती प्रक्रिया मध्ये दोन लाख रुपये डिपॉझिट कशासाठी घेण्यात आली .सदर डिपॉझिट कोणत्या अकाउंटला जमा करण्यात आले तसेच किती कर्मचाऱ्यांकडून हीच डिपॉझिट घेण्यात आले .यासंदर्भात जाहीर प्रकटनामध्ये डिपॉझिट रकमेचा उल्लेख केला आहे का .या सर्व वर प्रश्नचिन्ह आहे.
0 Comments