हिप्परगा रवा येथे सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मराठमोळ्या लावण्यांचे आयोजन
तुळजापूर: राज्यभरात तरुणाईला वेड लावणारी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मराठमोळ्या लावण्यांचे उद्या दिनांक 30 मार्च रोजी लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथे नरसिंह यात्रेनिमित्त आयोजन केले आहे. डान्सर गौतमी पाटील ही तुळजापूर तालुक्यात मागील दोन वर्षांपूर्वी वडगाव देव येथे कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. येथील कार्यक्रमात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याची पाहायला मिळाली होती. त्यामुळे गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दृश्य समोर आले होते. त्यामुळे पोलीस संरक्षणात गौतमी पाटील यांना अर्धवट कार्यक्रम करून परतल्या होत्या. त्यामुळे हिप्परगा रवा येथील नरसिंह यात्रा कमिटीने अनुचित प्रकार घडून घडू नये व हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
0 Comments