Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे उमरगा चि.येथे शनिवार दि.८ मार्च रोजी श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा होणार संपन्न

मौजे उमरगा चि.येथे शनिवार दि.८ मार्च रोजी श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा होणार संपन्न

""""""""'""""""""""""""""""""""""""""

सायंकाळीं ५:३० वाजता ग्रंथ वाचन व निरुपणास होणार प्रारंभ. 

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

वाचक व सुचक यांनी निरपेक्ष निष्काम सेवा बजावावी.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे उमरगा चि.येथे शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन गाव परिसरातील रामभक्त भाविकांनी या राम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन उमरगा चि.येथील रामभक्त ग्रामस्थांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी मौजे उमरगा चि.येथे श्री.लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असुन श्री. संत एकनाथ महाराज लिखित श्री. भावार्थ रामायणाचे हे १७ वे वर्ष आहे. शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ग्रंथ वाचन व निरुपणास सुरुवात होत असून रविवार दि.९ मार्च रोजी सकाळी ५:३० वाजता श्री लक्ष्मण शक्तीतून सावधान झाल्यानंतर ग्रंथ वाचन निरूपण सांगता होणार आहे. तब्बल बारा तास हा सोहळा होणार असुन श्री. भावार्थ रामायणातील युद्धकांडातील अध्याय क्रमांक ४३ ते ४९ असे सात अध्याय ओव्या ११३५ याचे रात्रभर वाचन व निरूपण होणार आहे.  तरी या श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्यासाठी गाव परिसरातील व तुळजापुर तालुक्यातील सर्व रामभक्तानी उपस्थित राहून राम कथेचा लाभ घ्यावा व वाचक व सुचक यांनी वेळेवर उपस्थित राहून निरपेक्ष व निष्काम सेवा बजावावी असे आवाहन उमरगा चि.येथील रामभक्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments