Hot Posts

6/recent/ticker-posts

जामखेड: दहा गुंठे शिमला मिरचीतून घेतली सात लाखाचे उत्पन्न जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची किमया

जामखेड: दहा गुंठे शिमला मिरचीतून घेतली सात लाखाचे उत्पन्न जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची किमया


अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील फकराबाद येथील प्रगतशील शेतकरी आणि सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे खाजगी सहाय्यक अजय सातव व त्याचे भाऊ विजय सातव या बंधूनी अवघ्या दहा गुंठे पॉलिहाऊस मध्ये लागवड केलेल्या शिमला मिरचीतून सात ते दहा लाख रुपयाचे उत्पन्न घेऊन एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

शेतकरी सातव यांनी बीएससी ऍग्री चे शिक्षण घेतले असून नोकरीच्या मागे न लागता त्यांनी दोन एकरावर तैवान पिंक या जातीच्या पेरूची लागवड केली असून तीन एकर साई सरबती या वाणाची लिंबोणीची बाग आहे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ठिबक सिंचन करून फळबागांच्या माध्यमातून शेतीला वर्षाला लाखो रुपयांची उत्पन्न मिळवुन युवा पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परिवर्त गायकवाड यांनी अजय सातव्यांच्या शेती फार्म हाऊसला भेट देऊन कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न काढून एक आदर्श प्रगतशील शेतकरी यांचे प्रतीक दिसली तसेच आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गायकवाड यांनी आपल्या शेतकऱ्यांना याबाबतची माहिती देऊन कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे पिके घ्यायला हवीत याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments