Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : गरिबांचा फ्रिज बाजारात दाखल, जारमुळे माठांना अवकळा

धाराशिव : गरिबांचा फ्रिज बाजारात दाखल, जारमुळे माठांना अवकळा


धाराशिव: मार्च महिना सुरू झाल्याने उन्हाचा पारा वाढत चालला आहे तहानलेल्या शरीरात थंड मातीच्या डेऱ्यातील माठ थंड पाण्याचा मिळणारा दिलासा अल्हाददायक असल्याने सामान्य कुटुंबातील नागरिकांना माठाच्या खरेदीचे वेध लागले आहेत. हे माठ आता बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

ग्रामीण भागातील कुंभार समाजातील तरुणांना माठाचा व्यवसाय अशक्य असल्याने परंपरेने माठ तयार करण्यात काही मोजकेच व्यावसायिक या व्यवसायात राहिलेले आहेत. वाढत्या महागाईमुळे माठ तयार करण्यासाठी येणारा खर्च व विक्री यातून मिळणारा नफा हा जेमतेम मिळतो; माठासाठी आवश्यक ती काळी व लाल चिकन माती बाहेरून खरेदी करावी लागते त्याची दर डिझेलच्या उच्चांकितरामुळे महागले आहेत. एक ट्रॅक्टर मातीसाठी पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत मातीला चिकनपणा येण्यासाठी घोड्याच्या लीद जमा  करावी लागत आहे;आता फिरत्या चाकाभोवती चिखलाला आकार देण्याची पद्धत कालबाह्य होत असून विजेवरील यांत्रिक पद्धतीचा चाकावर माठाला आकार देण्यात येतो साधारणता फेब्रुवारी महिन्यात माठ तयार करण्याचे काम सुरू होते जवळपास तीन महिने चालणाऱ्या व्यवसायासाठी मातीला आकार देण्यासाठी ते गावामध्ये भट्टी माठ पक्की करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्चही वाढला आहे. महागाईमुळे लहान माठाचे दर दोनशे रुपये तर मोठ्या आकाराच्या माठाचे दर तीनशे रुपये पर्यंत आहेत.

जारमुळे माठांना अवकळा

शहरासह ग्रामीण भागातही थंड जार पाण्याची व्यवसाय थाटली आहेत पाण्याच्या शुद्धीवर प्रश्नचिन्ह आहे मात्र नागरिकांना पाच रुपये पासून ते पंचवीस रुपयात थंड पाण्याचा जार उपलब्ध होत असल्याने बऱ्याच कुटुंबात किमान उन्हाळ्यात तरी जारचे पाणी घेतले जाते. ते परिणामी मोठ्या मेहतीने तयार केलेल्या व कमी खर्चाच्या माठाला मागणी कमी झाल्याचे चित्र आहे माठ तयार करण्यासाठीचा खर्च आणि मेहनतीचा वेळ घातला तरी मिळणारा फायदा कमीच असतो मात्र कुंभार समाजातील काही मोजक्यात व्यवसायिकांनी परंपरेप्रमाणे हा व्यवसाय सुरू ठेवला आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे बारा बलुतीदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे तरुणांमध्ये पारंपारिक व्यवसाय सुरू ठेवण्याची फारशी मानसिकता दिसत नाही फायद्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय परंपरेने सुरू ठेवण्याचा जेष्ठांचा प्रयत्न सुरू आहे जारच्या पाणी व्यवसायामुळे मोठ्या मेहतीने तयार केलेल्या माठाची मागणी कमी होत आहे.

 भाऊसाहेब पारे माठ व्यवसायिक

Post a Comment

0 Comments