Hot Posts

6/recent/ticker-posts

मैत्रिणीशी का बोलतो म्हणून मित्रावर कोयत्याने खुनी हल्ला कलम 109 सह आर्म ॲक्ट अन्वे गुन्हा दाखल -Solapur Crime News

मैत्रिणीशी का बोलतो म्हणून मित्रावर कोयत्याने खुनी हल्ला कलम 109 सह आर्म ॲक्ट अन्वे गुन्हा दाखल 


सोलापूर : माझ्या मैत्रिणीशी का बोलला या कारणावरून चिडून मित्रानेच मित्रावर कोयत्याने सपासप वार करून डोक्यावर मानेवर, खांद्यावर, पाठीवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना  रेल्वे स्टेशन परिसरातील गॅंगमन ऑफिस समोर मंगळवारी रात्री साडेदहा ते साडेअकरा या वेळेत घडली.  आकाश रंगसिद्ध राहणार फॉरेस्ट रेल्वे लाईन सोलापूर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे या प्रकरणी जखमेची तरुणाची आई सुरेखा रंगसिद्ध राऊतराव राहणार फॉरेस्ट सोलापूर यांनी फिर्याद दिल्याने हल्ला करणाऱ्या शंकर किसन वाडकर राहणार बाळे यांच्याविरुद्ध बी एन एस(BNS) कलम 109 सह आर्म ॲक्ट(Arms Act) 4/25 अन्वे गुन्हा नोंदवला आहे गुन्ह्याची गंभीरे लक्षात घेऊन सदर बाजार पोलिसांनी त्याला तातडीने बुधवारी पहाटे चार वाजून 35 च्या दरम्यान फौजदार नितीन शिंदे यांनी अटक केली आहे.

यातील जखमी आकाशाच्या शरीरावर डोक्यासह मानेवर खांद्यावर पाठीवर हातावर अन्यत्र खोलवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता(ICO) विभागामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी आकाशच्या आईने सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीचा मुलगा व संशयित आरोपी शंकर हे दोघे मित्र आहेत मंगळवारी रात्री साडेदहा ते साडेअकरा यादरम्यान दोघांमध्ये तू माझ्या मैत्रिणीची का बोलतो म्हणुन दोघांमध्ये भांडण झाले रागाच्या भरात शंकरने हातातील कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीस पहाटेच अटक(accused Arrest)

सदर बाजार पोलिसांनी या प्रकाराची माहिती मिळताच फौजदार नितीन शिंदे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली हल्ला करणाऱ्या आरोपीची शोधाशोध करून बुधवारी पहाटे साडेचार वाजता अटक केली.

दोन दिवस पोलीस कोठडीत(police custody)

खुनी हल्ला केल्याप्रकरणी शंकर वाडकर याला पहाटे अटक केल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांनी त्याला बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यास दोन दिवसाची 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments