Hot Posts

6/recent/ticker-posts

जामखेडच्या दोन मित्रांची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील मोशी येथील धक्कादायक घटना

जामखेडच्या दोन मित्रांची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील मोशी येथील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

पुणे: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील दोन तरुण मित्रांनी एकाच झाडाला एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील मोशी Smart शनिवारी सकाळी उघडकीस आली. या धक्कादायक घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरले असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुषार अशोक ढगे वय 25 आणि सिकंदर सलाउद्दीन शेख वय 30 दोघेही राहणार होंडा पिंपळगाव तालुका जामखेड अशी आत्महत्या केलेल्या दोघा मित्रांची नावे आहेत पोलिसांच्या माहितीनुसार तुषार ढगे आणि सिकंदर शेख हे दोघी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड भागातून पिंपरी चिंचवड येथील मोशी भागात भारत माता चौक येथे आले होते मात्र ते एका दिवसापूर्वी शहरात आले आणि दुसऱ्या दिवशी त्या दोघांचे मृत्यू निर्जन स्थळी एका झाडाला लटकलेली अवस्थेत आढळून आली आहेत प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याच्या समोर येत आहे मयत तुषार यांची चुलते दत्तात्रय रावसाहेब ढगे राहणार सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली तुषार व सिकंदर हे दोघेही चालक होते दोघांनी एकाच झाडाला एकाच वेळी गळफास घेतल्यामुळे आत्महत्या पूर्वनियोजित असावी असा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments