श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत भक्ताचा महापूर, देवीजींच्या पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी १५ लाख भाविकांनी घेतले दर्शन
धाराशिव(येरमाळा): महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेली धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या आई राजा उदो उदो जयघोषाने येडेश्वरी नगरी दुमदुमून गेली आहे. रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी श्री येडेश्वरी देवीची पालखी चुन्याच्या रानात दाखल होताच लाखो भाविकांनी मानाची चुनखडी वेचून व पुरणपोळीचा नैवेद्य फुले पालखीवर अर्पण करून देवीचे दर्शन घेतले प्राथमिक अंदाजानुसार 14 लाखापेक्षा जास्त भाविकांनी यात्रेसाठी हजेरी लावली असून गर्दीमुळे चारही बाजूस वाहनांच्या बारा ते पंधरा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.
आई राजा उदो उदोच्या जयघोष करीत हलगी झांज संबळाचा गजरात रविवारी दिनांक 13 एप्रिल रोजी श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुनखडी वेचण्याचा मानाचा कार्यक्रम विधी पार पडला चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेल्या यात्रेत रखरखत्या उन्हातही जवळपास १५ लाखापेक्षा जास्त भाविकांनी येडाईच्या नगरीत हजरी लावली भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येडाई नगरी भक्ती सागरात न्हाहुन निघाली होती.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान पार पडतो श्री येडेश्वरी देवीला महाराष्ट्र मध्ये येडेश्वरी चे भक्त येडाई या नावाने संबोधतात ही यात्रा पाच दिवसाची असून यात्रा उत्सवातील चुना वेचण्याचा प्रमुख व मानाचा कार्यक्रम रविवारी पार पडला यानिमित्त शुक्रवारपासून येरमाळा येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून देवीभक्त दाखल झाले आहेत पालखीचे आमराईत आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्ताचा हा सोहळा आणखीन चार दिवस कायम राहणार आहे विशेष म्हणजे प्रचंड गर्दीतून येडेश्वरी मातेच्या मुख्य मंदिरापासून ते आमराईपर्यंत हलगी जहाज संबळाच्या तालावर व आई राजा उदो उदो च्या नाम घोषणे भाविक मंत्रमुग्ध होऊन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे पालखीस आमराईत पोहोचण्यास तब्बल एक तास उशीर झाला.
पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या वतीने पुष्पृष्टी
श्री येडेश्वरी देवीचा पालखी सोहळा डोंगरातील मंदिरातून चुन्याच्या रानात अमराईकडे निघाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली पालखी सोहळा चुन्याच्या रानात पोचल्यानंतर तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वतीने हेलिकॉप्टर मधून पालखी सोहळा व भाविकांवर पुष्पृष्टी करण्यात आली दुपारी एक वाजेच्या सुमारास पालखी सोहळा आमराईत पोहोचला.
0 Comments