Gold Price Hike | सोन्याचा दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर; 10 ग्रॅमसाठी एवढी मोठी किंमत?
सोने 93 हजार पार दरात प्रतिदिन वाढ लवकरच शंभरी पार
मुंबई: अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्क धोरणाचा परिणाम सोन्यावर होऊन सोन्याचे भाव ५५ हजार रुपयापर्यंत खाली येतील अशी चर्चा सध्यातरी हवेत विरली आहे आयात शुल्क लागू करण्यास 90 दिवसाची स्थगिती दिल्याने दिवसेंदिवस सोने-चांदीचे दर वाढत चालले आहेत आताची दरवाढीची गती पाहता लवकरच सोने शंभरी पार करेल असे चित्र आहे एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल 29 विवाह मुहूर्त आहेत त्यामुळे भविष्यात अधिक दराने सोने खरेदी करायला लागू नये यासाठी वर आणि वधू पक्षाकडील मंडळींनी सराफ पेठेत दागिने खरेदीसाठी गर्दी केली आहे.
सोने चांदीच्या भावात काही दिवसांचा अपवाद सोडल्यास प्रतिदिन वाढत होताना दिसत आहे साहजिकच सोनी 93 हजार 800 तर चांदी 98 हजार रुपये वर पोहोचली आहे आता तीन महिने लग्न करायचे मुहूर्त असल्यामुळे सोने चांदीचे भाव कमी झालेले नाहीत मागील काही दिवसापासून शेअरचा आलेख सातत्याने कोसळत आहे त्यामुळे त्यामधील गुंतवणूक कमी होत असून अनेक जण पुन्हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत महागाईचा आलेख सतत उंचावत असला तरी सोने-चांदी खरेदीवर काहीही परिणाम जाणवत असल्याचे सराफ व्यवसायिकाची मत आहे.
सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे घटक
सर्वसाधारणपणे लग्न आणि सणाच्या काळात सोन्याची मागणी वाढते चलनवाढीच्या काळात चलनाचे मूल्य कमी होते अशा परिस्थितीत सोन्याची पैसे गुंतवण्यास अनेक जण प्राधान्य देतात सोन्याने व्याजदर यांचा व्यस्त संबंध असतो जसजसे व्याजदर वाढतात तसे तसे लोक जास्त व्याज मिळवण्यासाठी त्यांचे सोने विकतात त्याचप्रमाणे जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा लोक अधिक सोने खरेदी करतात त्यामुळे मागणी वाढते सोने चांदीची मागणी सहसा चांगल्या पावसाळ्यानंतर कापणी नंतर आणि परिणामी नफा वाढल्यानंतर वाढते सामान्यता भारतीय रुपयाची अवमूल्य झाल्यास सोन्याची आयात महाग होते.
- गेल्या पाच वर्षातील सोने दरवाढीची कारणे
- कोविड 19 वैश्विक महामारी
- सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य
- भांडवली बाजारातील घसरण
- डॉलरच्या किमतीत वाढ
- खरेदीदारांच्या संकेत 15 टक्के वाढ
- काही देशांकडून सोन्याचा औषधी निर्मिती इलेक्ट्रॉनिक पार्ट्स औद्योगिक उत्पादने यात वापर
- रशिया युक्रेन हमस इस्रायल देशांमधील युद्धजन्य स्थिती तसेच अमेरिकेचे निर्यात धोरण
जगभरातील देशाचा सोने खरेदी कडे वाढलेला कल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणीपेक्षा कमी असलेल्या पुरवठा अनेक देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि चीन अमेरिकेचे व्यापार युद्ध अशा कारणामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरात विक्री मी वाढ होत आहे सोन्याचा दर सध्या 97 हजार 600 प्रति तोळा रुपयावर पोहोचला आहे तरी सोन्याची वर्षभरात घेतलेली 23 हजाराची उसळी गुंतवणूक म्हणून दिलेला सर्वाधिक परतावा यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये सोने खरेदी विक्री व्यवहारात लक्षणे वाढ झाली आहे.
सोने लाखाच्या उंबरठ्यावर
सोनी दरवाढीचा दहा वर्षाचा आलेख काढला तर गतवर्षी म्हणजेच 2024 मध्ये सोने दरात प्रचंड मोठी वाढ पहावयास मिळाली. गेल्या वर्षात सोनी तब्बल 23 हजारांनी वाढले तसेच यावर्षीच्या तीन महिन्याच्या आलेख काढला तरी सोने दर जानेवारीमध्ये 80 हजार प्रति तोळा होते ते फेब्रुवारीमध्ये 87 हजार पोचले मार्चमध्ये तर सोनी 90 हजारावर पोचले आता एप्रिल महिन्यात सोने एक लाखाच्या उंबरठ्यावर पोचली आहे.
0 Comments