निरोप समारंभातच तिने घेतला जगाचा निरोप!
परंडा येथील घटना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू
धाराशिव - परंडा शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम सुरू असताना वर्षा खरात वय 20 राहणार नाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर हिचे हृदयविकारांनी निधन झाले मनोगत व्यक्त करत असताना हसत हसत ती खाली कोसळली ही दुर्घटना शुक्रवार दुपारी घडली.
वर्षा बीएससीच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होती या शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी आयोजित केला होता.ती मंचावर आपले मनोगत व्यक्त करत होती महाविद्यालयीन काळातील अनेक गमतीजमती आनंदाचे क्षण हसत हसत सर्वांशी शेअर करत होती प्राध्यापक व विद्यार्थीही तिच्या भाषणातील संवादावर हसून दाद देत होते. तिचे भाषण रंगात असतानाच अचानक चक्कर येऊन खाली कोसलळी प्राध्यापकांनी तात्काळ परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले ;परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मदत घोषित केले तिचे आई-वडील नातेवाईकांनी हंबरडा आपला कॉलेजच्या मैत्रिणींनाही अश्रू होणार झाले होते.
पंधरा वर्षांपूर्वी झाली होती हदयशास्त्रक्रिया
वर्षाला लहानपणापासूनच हृदयाचा त्रास होता त्यामुळे तिच्यावर पंधरा वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली.
सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल
वर्षा स्टेजवर भाषण करत असताना तिची मैत्रीण समोरून तिचा व्हिडिओ बनवत होती यावेळी ती आपल्या भाषणाद्वारे प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांनी खळखळून हसवताना व स्वतःही हसताना दिसत आहे परंतु अचानक चक्कर येऊन कोसळताना तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी ही हळहळले.
0 Comments