संतापजणक घटना: अल्पवयीन विद्यार्थिनीवर डॉक्टरकडून अत्याचार, संतप्त नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक आरोपीला नाशिक मध्ये अटक
अहिल्यानगर: संगमनेर शहरातील करपे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादाय घटना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली अखेर हे रुग्णालय बंद पाडण्यात आले आरपी डॉक्टरला संध्याकाळी नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी संगमनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ती एसटी बसणे संगमनेरला आली होती महाविद्यालयात गेल्यानंतर प्रकृती अस्वस्थ वाटल्याने महाविद्यालय प्रशासनाने तिला उपचारासाठी शहरातील करपे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान डॉक्टर अमोल करपे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीच्या जवळ आला तुला बरं वाटतं का? असे विचारून तिला टेरेसवर नेले तिथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला यावेळी घाबरलेल्या मुलींनी आरडाओरोट केली मात्र ओरडलीच तर आई वडिलांना सांगून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
ही घटना सकाळी समजतात मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली या ठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वाद झाला याप्रसंगी मोठा तणाव निर्माण झाला होता या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी रुग्णालयावर दगडफेक केली आणि रुग्णालय पण पाडले त्यानंतर ग्रामस्थांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टरला कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सायंकाळी डॉक्टर करपे याला नाशिक परिसरातून अटक केली आहे त्याला आणण्यासाठी संगमनेर पोलिसांची टीम नाशिकला रवाना झाली होती या गंभीरघटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे संगमनेर पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments