महापोलीस मित्र संघ संस्थापक अध्यक्षा अनिता गणेश लष्करे यांना कर्तुत्वान रणरागिणी पुरस्कार जाहीर
तुळजापुर : सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या महापोलीस मित्र संघाच्या संस्थापक अध्यक्षा अनिता गणेश लष्करे यांना किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने कर्तुत्वान रणरागिणी पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय लक्ष सामाजिक संस्था आयोजित रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता राजश्री शाहू महाराज नाट्यगृह दसरा चौक कोल्हापूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे . या पुरस्काराचे वितरण राजशेखर..अभिनेते.झी मराठी मालिकेतील शिकवीन तुला चांगला धडा यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनिता लष्करे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहेत.
0 Comments