Hot Posts

6/recent/ticker-posts

वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द-Ration Card one lakh income

वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द-Ration Card one lakh income


मुंबई: राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम शासनाने हाती घेतली असून यात यावर्षी वार्षिक एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे याबाबत शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.

सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या अनुदान यावर गुजराण करणारी अनेक कुटुंबी आहेत अनेक शिधापत्रिकाधारकांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे आहेत सध्या एकल कुटुंब पद्धत रूढ होऊ लागली आहे; तरीही अनेक शिधापत्रिका वेगवेगळ्या केलेल्या नाहीत दुसरीकडे शासनाकडून ही नव्याने शिधापत्रिका मिळत नाहीत त्यामुळे जुन्या शिधापत्रिकेतील नावे राहिली आहेत शिधापत्रिकेतील नावांच्या छाननीसाठी शासनाने नुकतीच बायोमेट्रिक तपासणी केली आहे यावेळी आधार कार्ड ला शिधापत्रिका जोडण्यात आल्या मात्र आता शासनाने एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्यात निर्णय घेतला आहे. यावेळी शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी खाजगी कंपनीतील कामगार यांचे उत्पन्न एक लाख रुपये असले किंवा ज्यांच्याकडे केसरी आणि पिवळे शिधापत्रिका असेल ती शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवुन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका केली असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांची माहिती राज्य शासनास सादर करावी अशी सूचना देण्यात आले आहेत.

राज्यात सहा कोटी लाभार्थी आहेत ही संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कारवाही करण्यासाठी राज्यात 1 फेब्रुवारी 2021 ते 31 एप्रिल 2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्यात आली मात्र अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडी अडचणी विचारात घेऊन ही मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Post a Comment

0 Comments