लातुर :एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या लिपिकास ३ वर्षाचा कारावास लातूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
लातूर: एमआयडीसीचा भाडेपट्टा करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी चलनाद्वारे भरण्यात आलेली पावती जमा करून दस्त देण्याच्या कामासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या येथील सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालयातील एका लिपिकाला तीन वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी. रोटे यांनी ठोठावली आहे आठ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
अहमदपूर एमआयडीसीच्या जागेचा भाडेपट्टा करण्यासाठी तक्रारदाराने मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातून स्टॅम्प ड्युटी चलन काढले होते सदर चलन जमा करून दस्त देण्यासाठी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचा कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे यांनी तक्रारदाराकडून 1000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती यावरून तक्रारदाराने लातूरच्या लाच लचपत प्रतिबंधक विभागाला कळवले होते लाचेच्या 1000 रुपये कनिष्ठ लिपिक विष्णू तुळशीदास काळे याला मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते.ही घटना 5 जानेवारी 2017 मध्ये सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली होती याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण लातूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात चालले न्यायालयाने एकूण सात जणांच्या साक्षी नोंदवल्या त्यात फिर्यादी व पंच यांची साक्षी महत्वाची ठरली साक्षी पुरावे गृहीत धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी रोटे यांनी आरोपी विष्णू तुळसीदास काळे याला तीन वर्षाचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
0 Comments