Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे जिवंत सातबारा मोहिमेचा प्रारंभ-Chivari Jivant Satbara Mohim

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे जिवंत सातबारा मोहिमेचा प्रारंभ


तुळजापूर/राजगुरु साखरे : शेत जमिनीच्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत न झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सातबारा वरील मयत खातेदाराच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेस शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील तलाठी श्री कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी त्यांनी चावडी वाचन करून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर मयत खासदारांच्या याद्या तयार करण्यात येतील. तसेच वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे विहित कालावधीमध्ये सादर करण्यात यावे असे सांगितले. यावेळी ग्रामसेवक श्री नरहरी कांबळे तलाठी श्री कुलकर्णी विकास कार्यकारी सोसायटीची चेअरमन बालाजी शिंदे ,सरपंच पिंटू बिराजदार, उपसरपंच लक्ष्मण लबडे, सुधीर झिंगरे, अरुण कोरे, ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments