Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरडा खोकला येतोय? हे उपाय करून पहा-Korda Khokla Gharguti Upay

कोरडा खोकला येतोय? हे उपाय करून पहा-

नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेकांना कोरड्या खोकल्याची लागण झाल्याची दिसून येतो. कोरडा खोकला तो म्हणजे ज्या बरोबर कफ पडत नाही असा खोकला हा खोकला अचानक वाढतो आणि खोकून खोकुन व्यक्ती हैराण होऊन जातो. श्वासनलिकेच्या अनेक सामान्य आजारामध्ये कोरडा खोकला आढळतो सध्या या खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरडा खोकला येण्याची कारणे

थंड हवेत आपण नाकाने श्वास घेतला की त्या कार्यात मुळे नाकाच्या आतील पातळ मांसल आवरणाला म्युकस मेम्ब्रेन सूज येते त्यामुळे शिंका येतात नाकातून पाणी व्हायला लागते म्हणजेच सर्दी होते. दोन ते तीन दिवसात जर काळजी घेतली नाही आणि पुन्हा  थंडी जात राहिल्याने ही सर्दी घट्ट होते. यालाच आपण सामान्य भाषेत कफ म्हणतात हा कप नाक आणि घसा यांच्यामध्ये अडकून राहतो अगदी कमी प्रमाणात असलेला हा कफ आपल्याला  श्वासाबरोबर बाहेर येण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कोरडा खोकला येऊ लागतो.

कोरडा खोकला लागल्यावर कोणती काळजी घ्यावी

  • थंडीच्या काळात सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा अत्यावश्यक  कारणाशिवाय बाहेर पडू नये
  • शाळा कॉलेज ऑफिस व्यवसाय धंदा यासाठी सकाळी बाहेर पडताना अंगात स्वेटर तर घालावा पण नाकावरून स्कार्फ मफलर किंवा कान नाक आणि डोळे झाकणारी माकड टोपी वापरावी
  • दिवसातून चार वेळा कोमट पाण्याच्या गोळ्या दररोज कराव्यात त्यामुळे घशाची सूज आणि कफ नक्की कमी होतो.
  • सायंकाळी सूर्यास्तानंतर आणि सकाळी ऊन पडेपर्यंत घराची दारी खिडक्या बंद ठेवाव्यात.
  • झोपताना अंगावर गरम कपडे उबदार पांघरून असावे थंडीत जास्त असल्यास झोपताना सुद्धा कान टोपी वापरावी.
  • एक वर्षापेक्षा लहान मुलांचे थंडीत रोज संध्याकाळी आणि सकाळी छाती पाठ कपाळकांशील शिकावे. ..
  •    

कोरड्या खोकल्यावर उपाययोजना
खोकल्याचे प्रमाण कमी असेल तर गुळण्या करणे आणि घरगुती उपाय म्हणजे उपयोगाचे ठरते मात्र खोकल्याबरोबरच घसा दुखत असेल ताप आल्यासारखी वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा, कोरड्या खोकल्यासोबत दम लागू लागला किंवा श्वास घेण्यास छातीतून आवाज येऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. झोपल्यावर जास्त खोकला येणे आवाज बदलणे यासारख्या काही त्रास असेल आणि खोकला पाच दिवसापेक्षा जास्त राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असते.

Post a Comment

0 Comments