Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. शिरीष वळंसनकर आत्महत्या प्रकरण: आरोपीच्या जामीन अर्जावर ९ मे रोजी सरकारी वकिलांचे म्हणणे आरोपी मनीषा मुसळे मानेला ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी- Dr sirish walsankar Solapur

डॉ. शिरीष वळंसनकर आत्महत्या प्रकरण: आरोपीच्या जामीन अर्जावर ९ मे रोजी सरकारी वकिलांचे म्हणणे आरोपी मनीषा मुसळे मानेला ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी


सोलापुर : नामवंत मेंदूरोग तज्ञ डॉक्टर शिरीष वळंसकर यांचे आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा महेश माने मुसळे हिच्या जामीन अर्जावर ९ मे रोजी सरकारी वकील आपले म्हणणे सादर करणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे या अर्जावर सुनावणीसाठी सरकारी वकील त्याच दिवशी ठरणार आहे या अर्जावर न्यायाधीशांनी ठरवलेल्या सुनावणी तारखेला दोन्ही पक्षाच्या वकिलांची युक्तिवाद होणार आहेत.

18 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता सुमारास डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी त्यांच्या राहत्या घरात स्वतःच्या पिस्टल मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. डॉ. शिरीष वळंसनकर  यांना आत्महत्या प्रवर्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे माने या जबाबदार असल्याची फिर्याद डॉ. शिरीष वळसंकर यांचे चिरंजीव डॉ. अश्विन वळसनकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी तिच्या विरोध गुन्हा दाखल केला.  मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन मिळाले आहेत हजर केल्यानंतर प्रथम तीन दिवस आणि नंतर दोन दिवस असे पाच दिवस पोलीस कोठडी दिली होती ९ मे पर्यंत ती न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामीन साठी अर्ज दाखल केला त्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी सरकारी पक्षाचे म्हणणे सादर करण्यासाठी 9 मे ही तारीख दिली आहे.

पोलिसांकडून तपासात वनवे'च

डॉ. शिरीष वळंसनकर आत्महत्या प्रकरणात तपास करताना सदर बाजार पोलिसांनी विविध बाबी निदर्शनास आले आहेत अनेक प्रकारचा उलगडा देखील झाला आहे या प्रकरणात अनेक जण संशयाच्या भौऱ्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भातील काही पुरावे आणि माहिती देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे पोलिसांचा तपास हा वनवे  च अटकेतील आरोपीच्या दिशेने सुरू असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात पोलीस वर्तुळातून होत आहे.

Post a Comment

0 Comments