Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग: पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून गंधोरा येथे मारहाण प्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्ग:  पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून गंधोरा येथे मारहाण प्रकरणी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे रेन्यु कंपनीकडे जमिनीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला तेथे तैनात असलेल्या एमएसएफ सेक्युरिटी कंपनीच्या एका महिला रक्षकासह सहा जणांनी बेदम मारहाण करून महिलेचा विनयभंग केला होता. ही घटना दिनांक 23 रोजी घडलेली असूनही याप्रकरणी नळदृग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी व शिवसेना प्रदेश प्रवक्ते योगेश केदार यांनी लक्ष घालून केलेल्या प्रयत्नानंतर अखेर तीन दिवसांनी सहा जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की सुनिता दिगंबर सोनटक्के राहणार गंधोरा तालुका तुळजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की आमची शेती गंधोरा शिवारात असून त्यावर कुटुंबाची गुजराण होते आमचे शेताशेजारी रिन्यू पवन चक्की प्रकल्पाचे सबस्टेशन उभे केलेले आहे . सबस्टेशन येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यावेळी रिन्यू कंपनीची वाल्यांनी आमच्या शेतातून तीन ते चार महिने रस्ता केला होता; त्याचा मोबदला रेन्यु  कंपनीकडे बाकी होता माझा मोठा मुलगा पांडुरंग हा सदर मोबदला मागण्यासाठी कंपनीचे रमेश, गंगाधर व रावसाहेब शिंदे यांच्याकडे मागील सात महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु कंपनीचे लोक मला उडवा वडू ची उत्तरे देऊन माझा मोबदला देण्यास टाळाटाळ  करत आहेत बुधवारी दिनांक 23 रोजी सकाळी 11 वाजता मी माझे पती दिगंबर सोनटक्के माझा मोठा मुलगा पांडुरंग असे आम्ही आमच्या जमिनीतून गेलेल्या वाहनाचा मोबदला मागण्यासाठी आमचे शेताचे जवळील रेन्यु  कंपनीच्या सबस्टेशन येथे गेलो होतो;त्या ठिकाणी जाऊन माझा मोठा मुलगा पांडुरंग यांनी तेथील सेक्युरिटी वरील एकाला म्हणटला की मला रमेश गंगाधर व रावसाहेब शिंदे यांना भेटायचे आहे. त्यावेळी तेथील सिक्युरिटी गार्डने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतो तुम्ही तोपर्यंत थांबा असे म्हंटल्याने आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो त्यानंतर माझी दोन्ही लहान मुले महादेव व सहदेव हे पण त्या ठिकाणी आले थोड्यावेळाने एमएससीएफ सिक्युरिटी मधील आठ ते नऊ जण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आले व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला काही न बोलता धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

 त्यावेळी दोन सेक्युरिटीने माझे हात धरून ठेवले व त्यांनी मला खाली पडले त्यावेळी सिक्युरिटी पैकी तीन जण आमची भांडण सोडवीत होती व बाकीचे सेक्युरिटी वाले आम्हाला मारहाण करत होते त्यावेळी त्यांनी माझी साडी सोडून मला अर्ध नग्न करून मला मारहाण केली व माझ्या छातीला हात लावून माझ्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यावेळी सिक्युरिटी मध्ये असलेली शितल देवकर हिने माझ्या डाव्या हाताला धरून माझी बोट पिरगळविले त्यावेळी माझा मोठा मुलगा पांडुरंग जीव वाचून त्यांच्या तावडीतून पळून जात होता; परंतु त्यांनी त्याच्या मागे पळून त्याला सुद्धा मारहाण केली त्याच वेळी माझे पती यांच्या डोक्यात रोडने  मुक्कामार दिला त्याच दरम्यान कोणीतरी पोलिसांना फोनवरून बोलवून घेतले पोलीस त्या ठिकाणी आल्यानंत आमचे भांडण सोडवले असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी सहा जणाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अन्वे कलम 74, 118/1  115/2 189 /2, 191/2,190  अन्वे  गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments