डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेस आणखी दोन दिवस पोलीस कोठडी, आणखी खोलवर तपास करायचे असल्याचे पोलिसाचे म्हणणे
सोलापूर: येथील प्रसिद्ध मेंदु विकार तज्ञ डॉ. शिरीष वळंसनकर (Dr.sirisha valasankar)यांच्या आत्महत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या महिला आरोपीस पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी पुन्हा दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी न्यायालयात आल्यानंतर मोठी गर्दी झाली होत.
आरोपी मनीषा महेश माने उर्फ मुसळे (Manisha mane urf musle)वय (45) राहणार (बसवराज नेले नगर जुळे सोलापूर) हिला पोलिसांच्या उर्वरित तपासण्यासाठी दिनांक 25 एप्रिल पर्यंत दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात येत असून या कालावधीत देण्यात आलेल्या विविध मुद्द्यांचा पोलिसांनी तपास करावा असे मुख्य न्याय दंडाधिकारी (CJM)यांनी म्हटले आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री आठ वाजून 45 मिनिटांनाच्या सुमारास डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपल्या राहत्या घरी बेडरूम मधील वॉशरूम मध्ये स्वतःच्या पिस्टलने डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातील पोलिसांना प्राथमिक तपासात वेगवेगळी मुद्दे आले होते अशावेळी सर्व बाजूने तपासाची चक्री फिरविण्यात आली होती.
यानंतर मात्र डॉ शिरीष वळशंकर यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन वळसनकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने उर्फ मुसळे हिच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.वडिलांनी तिच्यामुळेच आत्महत्या केल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 108 प्रमाणे आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात पोलिसांनी तिला दिनांक 19 एप्रिल रोजी रात्री अटक केली होती आणि रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांना यांनी तीन दिवस पोलीस ठेवण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान पोलिसांनी तिच्याकडे विविध मुद्द्यावर तपास केला बुधवारी तिची पोलीस कोठडी संपत असल्याने तिला पुन्हा सदर बाजार पोलिसांनी मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रम सिंह भंडारी यांचे न्यायालयात हजर केले होते. तिच्याकडे आणखी अनेक मुद्द्यावरील तपास पूर्ण करावयाचा आहे यासाठी तिला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी लकडे यांनी केली तर सरकारी वकिलांनी देखील तपासाचा मुद्दा न्यायालयापुढे रेटला याविरुद्ध आरोपीच्या वकिलांनी पोलिसांनी ज्या मुद्द्यावर यापूर्वी तीन दिवसाची पोलीस कोठडी घेतली असल्याने पुन्हा आरोपीला पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत पोलीस कोठडी देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला. यावर न्यायदंड अधिकाऱ्यांनी पोलिसांना उर्वरित तपास करण्यासाठी दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले यासाठी आरोपीच्या वतीने एडवकेट प्रशांत नवगिरे यांनी तर सरकार तर्फे ऍडव्होकेट अमर डोके हे बाजू मांडत आहेत .
तपास प्रगतीपथावर पूर्ण करण्यासाठी पोलीस कोठडी हवी
डॉक्टर वळसकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या प्रगतीपथावर आहे पोलिसांना विविध मुद्द्यावर तपास करावयाचा आहे ही केस अत्यंत सेन्सिटिव्ह असून तपास पूर्ण करणे हा पोलिसाचा महत्त्वाचा भाग आहे पण आणखी काही तपास आरोपी महिलेकडे अपूर्ण राहिला आहे आरोपीने पाठवलेले मेल तपासणी फाडून टाकलेले पत्र हस्तगत करणे व अन्य बाबी तपासायचे आहेत त्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे असे सरकार पक्षाचे म्हणणे होते
न्यायालयाची सुरक्षा वाऱ्यावर सुरक्षा जवान युक्तिवा ऐकण्यासाठी
पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात आणल्यानंतर न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती जबाबदारी असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुमारे आठ ते दहा जवान एकत्रित आपले कर्तव्य सोडून न्यायालयात युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायदानाच्या कक्षेत उभे होते यावेळी मात्र त्यांच्या या कारभारावर बोट करत न्यायालयाची सुरक्षा वाऱ्यावर सोडलची चर्चा गर्दीतून व्यक्त होत आहे.
.......तर पोलीस कस्टडीची गरज काय?
या प्रकरणात पोलिसांनी तपास करण्यासाठी 10 मुद्दे मांडले होते पोलिसांनी त्यापैकी आठ मुद्द्यावर यापूर्वीच तीन दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास केलेला आहे उर्वरित दोन मुद्द्यापैकी एक मुद्दा हा आरोपीच्या प्रशासनावर वर्चस्व आणि स्टाफला त्रास देत असल्याचा आहे या मुद्द्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही 27 जणांचा 17 जवाब नोंदविण्यात आला आहे त्याबद्दल तपास करण्यासाठी कस्टडीचे गरज काय शिवाय मेलची मूळ प्राप्त करावयाची आहे असे पोलीसाची म्हणणे आहे पण ही प्रत मेलवर सहज मिळणार आहे यासाठी कस्टडीची कोणतीच गरज नाही पोलिसांनी दिलेली कारणे ही कस्टडीसाठी योग्य नाहीत असे म्हणणे आरोपीचे वकील एडवोकेट प्रशांत नवगिरे यांनी मुख्य न्यायाधीशारासमोर मांडले.
हॉस्पिटलमधील यांचे नोंदवले जवाब
डॉक्टर वळशंकर हॉस्पिटल मधील 27 कर्मचाऱ्यांचे आरोपी महिलेविरुद्ध पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत यामध्ये बाबासाहेब बनसोडे श्रीधर कुलकर्णी मळसिद्ध धुमाळी फार्मास गौरव कांबळे भाग्यश्री कवडे शोभा जाधव सुरेखा कारंडे किशोर नवगिरे नरसिंग निसा लोलू रेश्मा राऊत केदार मार्कंडे शहीद शेख सुरेखा जाधव शेता येवलकर स्वरूप सावळी मीरा सावंत रोहित ढवळे राधा फुलारी शितल गवळी सुनील गायकवाड डॉक्टर संजीव शिंदे दिनेश परळकर उमास शासन संतोष तासलकर प्रवीण इनामदार आणि विजयालक्ष्मी यांचा समावेश आहे.
या दहा मुद्द्यावर तपास सुरू आहे
- आरोपीने नामवंत डॉक्टरांना आत्महत्या करण्यास प्रवर्त केली हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा तपासणे
- आरोपीचा खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा यामुळे आत्महत्येच्या चिठ्ठीत उल्लेख मूळ दस्त हस्तगत करण्याचा तपास
- मूळ दस्त फाडलची फिर्यादीत नोंद यामुळे तपास अभिलेखावर आणणे
- मेलची फाडलेले तुकडे कुठे टाकले त्याचा शोध घेणे
- हॉस्पिटलमध्ये फेरफार आणि डॉक्टर विरुद्ध लोकांना भडकावणे या सहकारी कृत्याची चौकशी व पुरावे गोळा करणे
- या प्रकरणामागे हेतू आणि उद्देश काय आहे तपासणे
- याकर्त्यामध्ये आणखी कोणाचे हात आहेत का हे तपासणी
- हस्ताक्षराचे नमुने तपासणी
- डॉक्टरांना वारंवार कशाप्रकारे त्रास दिला याची माहिती गोळा करणे
- 27 जणांच्या तक्रारीची पडताळणी करणे
0 Comments