Hot Posts

6/recent/ticker-posts

साई चरणी तीन दिवसात सव्वाचार कोटीहून अधिक देणगी तब्बल अडीच लाखाहून अधिक भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ-Saibaba Shridi

साई चरणी तीन दिवसात सव्वाचार कोटीहून अधिक देणगी तब्बल अडीच लाखाहून अधिक भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ-Saibaba Shridi


शिर्डी : श्री साईबाबा संस्थान च्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सव पाच ते सात एप्रिल या कालावधीत संपन्न झाला या उत्सव कालावधीत एकूण चार कोटी 26 लाख 7 हजार 182 इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसाद दालयात एकूण एक लाख 61 हजार 529 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेतील एक लाख 76 हजार दोनशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पकटांचे वाटप करण्यात आले या तीन दिवसात तीन लाख 63 हजार 74 लाडू प्रसाद पॉकिटांची विक्री होऊन 72 लाख 61 हजार 480 उत्पन्न मिळाले.

साई भक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान साई बाबा भक्त निवास स्थान द्वारकावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा यांसह अतिरिक्त निवास व्यवस्थित साठी उभारलेल्या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळेत विविध भागांमधून आलेल्या पालख्यामधील पदयात्री साई भक्तांनी ही निवास व्यवस्थेचा लाभ घेतल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिला.

अशी मिळाली देणगी



Post a Comment

0 Comments