श्री येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा यात्रेस शनिवारपासून प्रारंभ यात्रा ,१२ ते १७ एप्रिल दरम्यान भरणार यात्रा १३ एप्रिल रोजी चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम
धाराशिव: आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा 12 ते 17 एप्रिल दरम्यान भरत आहे या यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट येरमाळा ग्रामपंचायत तहसील ग्रामस्थांकडून यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक राज्यातून श्री येडेश्वरी देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात चैत्र यात्रेनिमित्त 12 एप्रिल रोजी येरमाळ्यात दाखल होतात व 13 एप्रिल रोजी यात्रेतील मुख्य कार्यक्रम चुना वेचनाचा धार्मिक परंपरेत सहभागी होतात. लाखोच्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी येरमाळा ग्रामपंचायत तसेच येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट व गावकरी देवीचे भावीकभक्त व्यावसायिक यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावर्षी यात्रा महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित प्रसिद्ध छावा चित्रपट यात्रेकरूंना पाहण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. भाविकांच्या सोयीसाठी व उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे डोंगरावरील मुख्य मंदिराकडे व आमराईतील पालखी मंदिराकडे दर्शन रांगेवर भव्य मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडून येण्यासाठी पोलीस प्रशास सज्ज झाले असून चोख नियोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून पाण्याची व्यवस्था
प्रतिवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रा मोठ्या प प्रमाणात यात्रा भरणार असेल असे चित्र दिसून येत आहे येरमाळा तसेच परिसरात शेतकरी वर्गाने यात्रेच्या दृष्टीने आपल्या शेतातील सुगीची कामे उरकून घेतली आहेत तसेच शेतकरी आपापल्या विंधन विहिरीवर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करताना दिसत आहेत.
0 Comments