Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: आरोपी मनीषा मुसळे यांना 27 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: आरोपी मनीषा मुसळे यांना 27 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी


सोलापूर: प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे माने यांना न्यायालयात हजर केले असता मुख्य न्याय दंडाधिकारी एस एन रथकंठवार यांनी आरोपीचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून 14 दिवसांची म्हणजे 27 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली ;दरम्यान आरोपीच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष म्हणणे मांडणार होते मात्र यांनी पुन्हा म्हणणे मांडण्याचा अर्ज दिला आता 21 मे रोजी मांडले जाणार आहे. मनीषा मुसळे माने हिला मंगळवारी न्यायालयीन कोठडीतून बाहेर काढून दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.

तपास अधिकाऱ्यांनी तिच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती ती गुरुवारी संपल्याने तिला पुन्हा न्यायालयासमोर उभे केले होते. तपास अधिकारी यांना तिचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी करण्यात आली. यापूर्वी आरोपी मनीषा मुसळे यांना 25 एप्रिल 2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड व त्यानंतर आठ मे रोजी न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. सदर आरोपीच्या न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आल्यानंतर ती काम करत असलेल्या ठिकाणचे साक्षीदार गौस मकबूल जमादार,राजेश शिवाजी भागानगरी रेणुका गुरुराज खेत्री ,सविता मुळे सिद्ध धुमाळे, मळसिद्ध भाऊसाहेब धुमाळे यांना सदर महिला आरोपी ने रोख स्वरूपात काही रकमा दिल्या होत्या. साक्षीदाराच्या खात्यावरून आरोपीच्या खात्यावर त्या रकमा ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आली असल्याने गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने आरोपी मनीषा मुसळे माने यांचा अधिक तपास कराव्याचा असल्याने तिची पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याने 9 मे रोजी सदर आरोपीचा ताबा मिळण्या कामी न्यायालयात रिपोर्ट सादर केला असता सदर आरोपीस ताब्यात घेण्याबाबत परवानगी दिली.

त्यानुसार सदर आरपीएस 13 मे रोजी जिल्हा कारागृह सोलापूर येथून ताब्यात घेऊन न्यायालयात सक्षम हजर केले असता तिची 15 मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती; सदर महिला आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान यातील साक्षीदार व आरोपी यांच्यात समक्ष रुजवत करण्यात आली असता साक्षीदाराने आरोपीच्या समक्ष आरोपीने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडले असे सांगितले. आरोपीने सदर आर्थिक व्यवहाराबाबत तसेच घटनेचे अनुषंगाने इतर बाबींची माहिती सांगण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून उडवाउडुची उत्तरे देत आहे अजून काही साक्षीदाराकडे तपास बाकी असून यातून नवीन गोष्टीचा उलघडा झाल्यास नंतर पुन्हा सदर बाबत आरोपीकडे तपास करण्याची आवश्यकता दिसत आहे त्यामुळे आरोपीस पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली या 14 दिवसाच्या अगोदर पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. मनीषा मुसळे माने यांच्यावतीने एडवोकेट प्रशांत नवगिरे  एडवोकेट श्रीपाद देशक काम पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments