/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> लग्न सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू, लग्न मांडवातून निघाली अंत्ययात्रा

Hot Posts

लग्न सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू, लग्न मांडवातून निघाली अंत्ययात्रा

लग्न सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू, लग्न मांडवातून निघाली अंत्ययात्रा


सोलापूर: जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नववधुचा  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला हे घटना बाबळगाव तालुका माळशिरस येथे पराठे गळकुंडे या परिवारात घडली. रदे पिळून टाकणारी घटना घडली असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जानकी बाळासाहेब गळगुंडे असे मृत्यू झालेल्या नववधूचे नाव आहे. समीर हरिदास पराडे यांचे 13 मे रोजी घोटी तालुका माढा येथील जानकी याच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा निरानरसिंगपूर येथील मंगल कार्यालयात पार पडला लग्नानंतर नववधु सासरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात घेऊन जात असताना नव वधू वर काळाने झडप घातली.सासरच्या सुनेचा व माहेरच्या लेकीचा अचानक झालेल्या मृत्यूने दोन्ही कुटुंबाने टाहो फोडला होता मृत्यू झालेल्या जानकी वर बाभळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.सासरच्या सुनेच्या आणि माहेरच्या लेकीच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसला आहे. लग्नाच्या मांडवातूनच नववधू जानकी हिची अंत्ययात्रा निघाली. तेव्हा सर्वांची मने दुःखाने ओथंबून गेली होती

Post a Comment

0 Comments