/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> माजी पोलीस पाटलाचा दगडाने ठेचून खून, प्रेत पुलाखाली फेकले उमरगा तालुक्यातील थरारक घटना

Hot Posts

माजी पोलीस पाटलाचा दगडाने ठेचून खून, प्रेत पुलाखाली फेकले उमरगा तालुक्यातील थरारक घटना

माजी पोलीस पाटलाचा दगडाने ठेचून खून, प्रेत पुलाखाली फेकले उमरगा तालुक्यातील थरारक घटना


धाराशिव: उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील माजी पोलीस पाटलाचा खून करून प्रेत पुलाखाली फेकल्याने मोठी खळबळ उडाली आहे ही थरारक घटना सोमवारी दिनांक १९ मे रोजी सकाळी निदर्शनास आली आहे. याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा खुन कोणी व का केला? या सह अनेक प्रश्न अध्यापित अनुत्तरीत असून पोलिसांसमोर या गुन्ह्याचे गुढ उलगडण्याचे आव्हान उभे टाकले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरगा तालुक्यातील दाळिंब येथील माजी पोलीस पाटील शमशुद्दीन मियाॅंसाहब पटेल हे रविवारी दिनांक 18 मे रोजी रात्री त्यांची जीप एम एच २५-आर-८००५) घेऊन एकटेच घरातून गेले होते. सोमवारी सकाळी दस्तापुर येथे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली पटेल यांचा मृतदेह नागरिकांना दिसून आला यावेळी पोलीस पाटील सुधाकर गायकवाड यांनी मुरूम पोलिसांना घटनेची माहिती दिली यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे पोलीस कॉन्स्टेबल अमर महानुरे,संजीवन शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

या घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक झाला शफाअत अमना  उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या अज्ञात आरोपीने पटेल यांच्या डोक्यात दगड घालून खून केला व प्रेत पुलाखालील टाकले जीपमध्ये चालक सीटवरही दगड टाकण्यात आली होती. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यूमुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दस्तापुर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळावरील परिस्थिती ,वाहनाची अवस्था, आणि मृतदेहाची स्थिती पाहता पोलिसांनी सर्व शक्यतेचा तपास सुरू केला असून लवकरच सत्य समोरील येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>