Hot Posts

6/recent/ticker-posts

ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीने केला घात तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी धाराशिव जिल्ह्यातील घटना

ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीने केला घात तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी धाराशिव जिल्ह्यातील घटना


धाराशिव : दुचाकी वरून गावातून शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वार तरुणास भरदाव ट्रॅव्हल्सच्या डिगीच्या उघड्या राहिलेल्या पत्र्याच्या दरवाजामुळे आपला जीव गमावा लागला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला हा धक्कादायक अपघात शुक्रवारी दिनांक 16 रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील इट गावाजवळ एका ढाब्यासमोर घडला असून अपघाताबाबत काहीच कल्पना नसलेल्या ट्रॅव्हलच्या चालकास इतर वाहनधारकांनी पाठलाग करत नागेवाडी चौकात थांबून याबाबत माहिती दिली अपघातात मयत व गंभीर जखमी हे दोन्ही तरुण ईट येथील रहिवासी आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशी येथून पुण्याकडे निघालेल्या आत्ता ट्रॅव्हल्स एमएच झिरो एक सीआर 81 54 ही खाजगी बस शुक्रवारी रात्री वाशी येथून प्रवासी घेऊन ईट मार्गे भूम कडे निघाली होती. यावेळी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे बसच्या डिग्गीचा पत्र्याचा दरवाजा उघडाच राहिला होता तशाच अवस्थेत सदरील बस भरधाव वेगत ईट येथून पुढे भूमपुढे निघाली होती याचवेळी रात्री ईट येथील तरुण प्रवीण शिवाजी भोसले वय (19) व विशाल आप्पा भोसले हे दोघे दुचाकीवरून शेताकडे जात होते यावेळी विशाल हा दुचाकी चालवत होता त्यांची दुचाकी बसच्या जवळ गेली असता अचानक विशाल यास डिगीचा पत्रा समोर दिसल्याने तो खाली वाकल्याने बचावला मात्र पाठीमागे बसलेल्या प्रवीणचे अर्धे डोके या पत्राने फाडले व त्याचा जीव गेला. याच अपघातात विशाल भोसले हा देखील गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर ट्रॅव्हल्स तशीच भूमच्या दिशेने गेली. यावेळी काही वाहन चालकांनी पाठलाग करून सदरील ट्रॅव्हल्स नागेवाडी चौकास थांबून याबाबत  माहिती दिली. या अपघातानंतर संतप्त युवकांनी बसच्या काचाची तोडफोड करत चालकालाही चोप दिला; घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी अपघात स्थळाकडे धाव घेऊन पंचनामा केला प्रवीण भोसले यांच्यावर शोकाकुल वातावरणात शनिवार दिनांक 17 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले प्रवीणच्या पश्चात आई-वडील एक मोठा भाऊ असा परिवार आहे.सदरील ट्रॅव्हल्स वाशी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेली असून चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments