/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> Solapur: महावितरणच्या तीन अधिकाऱ्यांना एसीबीचा झटका, एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

Hot Posts

Solapur: महावितरणच्या तीन अधिकाऱ्यांना एसीबीचा झटका, एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल



सोलापूर : सोलार सिस्टीमच्या मंजुरीचे अनुषंगाने स्थळांची पहाणी करुन, कामाची मंजुरी देऊन मिटर बसविण्यासाठी १६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून खाजगी व्यक्तिच्या हस्ते ०८ हजार रूपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. या प्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत व्हनमाने व सहाय्यक अभियंता श्रीमती स्वाती सलगर आणि योगीनाथ म्हेत्रे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांना एसीबीचा झटका म्हणून पाहिली जातेय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदाराचा सोलर पावर सिस्टम बसविण्याचा व्यवसाय आहे. त्या अनुषंगाने स्थळांची पाहणी आणि मंजुरी च्या कामासाठी योगीनाथ म्हैत्रे ( हत्तुर, दक्षिण सोलापूर तालुका) या खाजगी इसमाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत पांडुरंग व्हनमाने व सहाय्यक अभियंता श्रीमती स्वाती सदानंद सलगर यांना प्रती वॅट 1000 रुपये प्रमाणे 16 हजार रुपयांची मागणी केली तरच तुमचे काम होईल, असे सांगितले.

याप्रकरणी तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यावर एसीबी पथकाने १६ मे व १९ मे रोजी लोकसेवक  अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत पांडुरंग व्हनमाने व सहाय्यक अभियंता श्रीमती स्वाती सदानंद सलगर यांची पडताळणी केली असता, व्हनमाने यांनी ५ हजार रुपये व श्रीमती सलगर यांनी ३ हजार रुपये लाचेची मागणी करुन म्हैत्रे यांच्याकडे देण्यास सांगितले. 

यावरुन मंगळवारी महावितरण कार्यालय, जुनी कंपाऊंड येथे एसीबी पथकाने रचलेल्या सापळ्यात योगीनाथ म्हेत्रे ८ हजार रुपयांची लाच रक्कम स्वतः स्विकारताना रंगेहाथ सापडला. त्यानुसार खाजगी व्यक्तिसह तिन्ही आरोपींविरूध्द फौजदार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, (ला.प्र.वि., पुणे) अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (ला.प्र.वि., पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी तर पोलीस उपअधिक्षक गणेश कुंभार (ला.प्र.वि. सोलापूर) पडताळणी अधिकारी होते. ही कामगिरी  पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार ग्रेड पोसई/एम.जी. चडचणकर, एएसआय/एस. व्ही. कोळी, पोना/३० एस.ए. नरोटे, पोशि/७६६ जी.व्ही. किणगी, पोशि/२२२२, आर.आर. हटखिळे व चालक पोकॉ/१६०८ शाम सुरवसे (सर्व नेमणूक : लाचलुचपत प्रतिबंध विभाग, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>