Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- माणसाच्या आयुष्यातली शालेय जीवन ही अशी आठवण असते जी माणसाच्या हृदयात कायम घर करून राहते,अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव येथील २००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मंगळवार ( दि,२७ मे ) स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते, हा मेळावा अत्यंत भावनिक अविस्मरणीय उत्साह पूर्ण ठरला , तत्कालीन शिक्षक श्री आर. डी.माने श्री एस.एन.वऱ्हाडे  श्री.पी. ए.जाधव त्या काळात विद्यार्थ्यांचे जीवन घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, कुणी सैनिक कुणी उद्योजक कुणी प्राध्यापक तर कुणी शेतकरी हे सर्व विद्यार्थी आजही  शाळेबद्दल आदर व शिक्षका विषयी कृतज्ञता बाळगून आहोत हे त्यांच्यातून दिसून येत होते, काहींनी भावनिक होऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला, सूत्रसंचालन आप्पाराव होळे स्मृतिचिन्ह सुनील बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.एकमेकांना भेटण्याचे आश्वासन देत पुन्हा असे कार्यक्रम आयोजन करण्याचा निर्धार केला.

Post a Comment

0 Comments