Leopord attack-अखेर बिबट्याने पळवलेल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला 30 तासानंतर मृतदेह शोधण्यात वन विभागाला यश
पुणे : दहिटणे तालुका दौंड येथील बापूजी बुवा वस्तीवरील मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने ११ महिन्याच्या चिमुकल्यावर झडप घालून त्याला पळवले होते तब्बल ३० तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला आहे . बिबट्याचे हल्ल्यात त्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले मृतदेहाचे काही भाग वन विभाग व पोलिसांच्या हाती लागली आहेत.
या घटनेचे अधिक माहिती अशी की अन्वित ढोला भिसे वय ११ महिने हा रात्री आपल्या आईच्या कुशीत झोपला होता बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने अलगद आईच्या जवळ साखर झोपेत असलेल्या अन्वितला जबड्यात धरून उचलून नेले.मुलाच्या रडण्याच्या आवाजाने भिशे कुटुंबीयांनी बिबट्याच्या मागे धाव घेतली मात्र परिसरात असलेल्या उसाच्या शेतात अंधाराचा फायदा घेत बिबट्या मुलाला घेऊन प्रसार झाला होता. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम राबवली होती गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घटनास्थळापासून अवघ्या चारशे ते पाचशे फुटावर मोठ्या उसाच्या शेतात मुलाच्या शरीराचे काही भाग वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले; शरीरावरील कपडे कडेला पडल्यामुळे हे शरीराचे तुकडे आण्विक धुवा भिसे याचेच असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरड्या मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले घटनास्थळी यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाली त्यांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.
दहिटणे परिसरातील चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्या निष्पाप लहान मुलाला आपला जीव गमावा लागला वन विभागाने तातडीने उपायोजना करून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावी तसेच राहू बेट परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा
बाळासाहेब पिलाने दहिटणे व सागर शेलार मिरवडी
घडलेला प्रकार दुर्दैवी असून नरपक्ष बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत परिसरात पिंजऱ्याची संख्या वाढवून बिबट्यांना जेरबंद केली जाईल तसेच नागरिकांनी देखील सतर्क रहावे
राहुल काळे वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड
0 Comments