Hot Posts

6/recent/ticker-posts

तोतया वकील महिलेने उकळी सहा लाखाची खंडणी-Pune News

तोतया वकील महिलेने उकळी सहा लाखाची खंडणी-Pune News


पुणे : लोणी काळभोर परिसरात राहणाऱ्या स्नेहल हरिश्चंद्र कांबळे वय 32 या महिलेने कडू बाबुराव सातपुते वय 63 राहणार दहिगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या व अशिक्षितेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना वकील असल्याचे खोटे सांगितले त्यांची दिशाभूल करून तिने सातपुते यांना न्यायालयातून त्यांच्या सुनेपासून सोडचिठ्ठी घेऊन देण्याची आमीष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख 94 हजार रुपये रोख व बँक खात्यावर पैसे घेऊन सोडचिट्टी न देता त्यांचे आर्थिक  फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून खंडणी स्वीकारणाऱ्या वकील महिलेला  रंगेहात जेरबंद केली आहे.

आरोपी स्नेहल सोनकांबळेने सातपुते यांना त्यांच्या सुनेने बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे तसेच तिने महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे अशी खोटे कारण सांगून पोलीस व कोर्ट कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील नाहीतर त्यांना अटक होईल अशी भीती घातली वेळोवेळी खोटी माहिती देऊन त्यांना वारंवार अटक करण्यात येईल असे सांगत त्यांच्याकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात पाच लाख 94 हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतले.तक्रार दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी एक स्वतंत्र पथक तयार करून कांबळे या महिलेला तक्रारकाराकडून 15000 रुपये खंडणीची रक्कम घेताना सापळा रुचून अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments