Hot Posts

6/recent/ticker-posts

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल अडीच वर्षात महसूलचे 32 लाचेच्या जाळ्यात ,पोलीस खाते दुसऱ्या स्थानी -Anti corrupation bureo Crime

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल 

अडीच वर्षात महसूलचे 32 लाचेच्या जाळ्यात ,पोलीस खाते दुसऱ्या स्थानी 


अहिल्यानगर : सामान्याचे सेवेसाठी नेमण्यात आलेल्या सरकारी बांबूचे महिन्यात काठी येणाऱ्या पगारात भागत नाही ही बाब लाच लचकत प्रतिबंध विभागाच्या अडीच वर्षातील कारवाईवरून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये महसूल खात्याचे 32 अधिकारी कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले तर पोलीस खात्याच्या 29 कर्मचाऱ्यावर लाच स्वीकारण्याच्या आगुन्हा दाखल झाला त्यामुळे गेल्या अडीच वर्षात सरकारी बांबूंना लाज कडू लागले.

सरकार गाव खेड्यातील माणसाचं जगणं सुसह्य व्हाव यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवते त्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी यंत्रणा दिवस रात्र थांबते असे म्हटले जाते कारण सामान्य माणसाकडून जमा होणाऱ्या कराच्या पैशातून सरकारी यंत्रणा चालते ; सरकारी योजना साठी गाव पातळीपासून मंत्रालयापर्यंत शासनाचे यंत्रणा कार्यरत आहे खेड्यातील मळक्या कपड्याचा माणूस सरकारी कार्यालयात आल्यानंतर त्याला आशादायी किरण दिसला पाहिजे त्याला न्याय देण्यासाठी अधिकारी कर्मचारी काम करतात मात्र त्याला काही अपवाद आहेत. काही अधिकारी कर्मचारी सामान्य माणसाच्या किरकोळ कामासाठी अत्यंत तुटपुंजी लाच घेतात. लाच घेणे घेणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तरी विविध सरकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी लाचेच्या आमिषाला बळी पडतात  त्याचे अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. 

या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली तक्रार लाचलुजपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात आणि त्यानंतर शहानिशा करून पडताळणी अंतिम कारवाई केली जाते गेले अडीच वर्षातील आकडेवारीवरून लाच स्वीकारण्यात शासकीय यंत्रणा बिनघोर झाल्याचे लाच लुचतत कारवाईवरून दिसते गेल्या अडीच वर्षात याच लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाने शासनाच्या विविध विभागात 77 सापळे लावून 109 लाच खोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर त्यात काहीनींही प्रत्यक्षात लाच स्वीकारली तर काहींनी लाज स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

अडीच वर्षात महसूल विभागाचे 32 कर्मचारी अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडले असून पोलीस खात्याची 29 कर्मचाऱ्यांवर लाचेचा गुन्हा दाखल झाला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद विद्युत पाटबंधारे महावितरण आरोग्य विभागाच्या कर्मचारी व वर्ग एक दोन तीन च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात खाजगी व्यक्तीही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.

अडीच वर्षातील बरबटलेली लाचखोर

2023 : पोलीस 11, महसूल 12 ग्रामविकास 4, शेती महामंडळ 1 , सहकार 3 , विद्युत 2 , जिल्हा परिषद 3 , नगरपरिषद 1,  भुमिअभिलेख 1 , पाटबंधारे 4, औद्योगिक महामंडळ 1, आरोग्य 1

2024: नगर विकास 1, वैद्यमापन शास्त्रीय जिल्हा परिषद 5,पोलीस 16 ,विद्युत 6, पाटबंधारे 2, महसूल 11, उत्पादन शुल्क शिक्षण 1, वसंतराव नाईक महामंडळ 1, भूमि अभिलेख 1

 2025 : महसूल 9, पोलीस 3, लेखा येत म्हसव्यवसाय विभागीय दुय्यम निबंधक ग्रामविकास विभाग 1

लाचेसाठी खाजगी व्यक्ती प्यादे

स्थानिक पातळीवर शासकीय अधिकारी कर्मचारी खाजगी व्यक्ती मदत म्हणून काम करतात खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून लाच स्वीकारण्याची सापळा कारवाईतून स्पष्ट झाली आहे गेल्या अडीच वर्षात 35 खाजगी व्यक्ती लाच लुचपतच्या कारवाईत अडकले तपासात सरकारी अधिकाऱ्यांसाठी लाच स्वीकारल्याचेही पुढे आले

सरकारी कार्यालयात लाच देण्याने लाच घेणे गंभीर गुन्हा आहे कोणीही लाचेची मागणी केल्यास गोपनीयता पाळून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाते.

                  अजित त्रिपुटे उपअधीक्षक लाच लचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर

Post a Comment

0 Comments