रक्षकच निघाले भक्षक - पोलीस निरीक्षकासह महिला पोलीस कर्मचारी 95 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, पोलीस दलाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे: मुलाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी आईकडे एक लाख रुपयांची लाच मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला आणि त्याच्यासाठी लाच स्वीकारणारे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.मारोती निवृत्ती शेळके वय 54 वर्षे, पोलीस निरीक्षक, पोस्टे धाराशिव ग्रामीण वर्ग - 1, तसेच महिला पोलीस कर्मचारी मुक्ता प्रकाश लोखंडे वय 34 वर्षे, मपोना/ 1671 पोस्टे धाराशिव ग्रामीण असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे नावे आहेत.
या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या मुलाचे गुन्हयात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचारी मुक्ता लोखंडे यानी मारूती शेळके, पोलीस निरीक्षक यांच्यासाठी व स्वतः साठी 1 लाख रुपयांचे लाचेची मागणी केली. तक्रारदार यांच्या तक्रारीनंतर दिनांक 25/06/2025 रोजी शासकीय पंचासह मारोती शेळके, पोलीस निरीक्षक, पोस्टे धाराशिव ग्रामीण यांची त्यांच्या पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन कामा संदर्भात चर्चा केली असता सदर चर्चेत त्यानी मुक्ता लोखंडे हिला भेटण्यास सांगितले.
सदर वेळी आलोसे मुक्ता लोखंडे यांनी तक्रारदार यांचेकडे पोलीस निरीक्षक मारोती शेवाळे यांच्यासाठी 1 लाख रुपयाची मागणी करुन तडजोड अंती 95 हजार रुपये लाचेची रक्कम दिनांक 25/06/2025 रोजी शासकीय विश्रामगृह, धारशिव येथे रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचेची मागणी पडताळणी अंती आज 25/06/2025 रोजी शासकीय विश्रामगृह, धाराशिव च्या समोर शासकिय पंच यांचे समक्ष तक्रारदारा कडुन लाच स्विकृती सापळा कारवाईचे नियोजन केले असता तक्रारदार यांच्या कडून आलोसे श्रीमती मुक्ता लोखंडे यांनी लाचेची 95000/- हजार रक्कम स्वीकारली असता रंगेहाथ महिला पंच समक्ष करवी ताब्यात घेण्यात आले आहे.ही सापळा कारवाई सापाळा अधिकारी- श्री. योगेश वेळापुरे, पोलीस उपअधीक्षक,सहायक सापळा अधिकारी - बाळासाहेब नरवटे, पोलीस निरीक्षक, श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. सापळा पथक - पोलीस अमंलदार नागेश शेरकर, पोलीस अमंलदार शशीकांत हजारे यांनी केली. याप्रकरणी दोन्ही आरोपी विरुद्ध भ्र. प्र. अधिनियम 1988 चे कलम 7, 7 अ प्रमाणे व आलोसे क्र. 1. मारोती निवृत्ती शेळके वय 54 वर्षे, पोलीस निरीक्षक, पोस्टे धाराशिव ग्रामीण यांनी सदरची लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांचे विरोधात भ्र. प्र. अधिनियम 1988 चे कलम 12 प्रमाणे पोस्टे आंनदनगर, धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यांची प्रक्रिया सुरू आहे..
▶ आरोपीताची घरझडती - आलोसे यांची घरझडती सुरू आहे.
▶️ आरोपीताचे अंगझडती- 1. आलोसे शेळके यांचे अंगझडतीत एक विवो कंपनीचा व एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल मिळून आला.
आलोसे यांचे ताब्यातील 02 मोबाईल जप्त केले असुन त्यांचे विश्लेषण सुरु आहे.
2. आलोसे लोंखडे यांचे अंगझडतीत एक ओपो कंपनीचा मोबाईल, एक बजाज कंपनीची मोटारसायकल, त्यांची चावी व ओळखपत्र मिळून आले.
आलोसे यांचे ताब्यातील 01 मोबाईल जप्त केले असुन त्यांचे विश्लेषण सुरु आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
पोलीस उप अधीक्षक, धाराशिव:- 02472- 222879 वर संपर्क साधावा.
0 Comments