कौतुकास्पद ! तुळजापुर तालुक्यातील ‘ कुंभारी’ गावाला टीबी मुक्त ग्रामपंचायत घोषित
तुळजापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे:
पंतप्रधानानी क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट २०२५ ला पूर्ण कराण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टीबी मुक्त अभियानातून तुळजापूर तालुक्यातील कुंभारी या ग्रामपंचायतीची टीबी मुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली आहे..
TB मुक्त भारत २०२५ सर्व्हे दरम्यान कुंभारी गाव हे एकही TB रुग्ण आढळला नसल्याने, कुंभारी गाव TB मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले. कुंभारी येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेली जनजागृती व त्यावरील राबविलेल्या उपाययोजनाचे फलित म्हणून तालुक्यातील टीबी मुक्त होण्याचा मान आहे.
यावेळी पंचायत समिती तुळजापूर येथे मा. श्री. ऋषिकेश पिंपळे (प्रशासन अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर). मा.श्री. सुखदेव पंडागळे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर) तसेच मा. श्री. डॉ. रफिक अन्सारी (तालुका आरोग्य अधिकारी तुळजापूर), मा.डॉ. अविनाश ढगे (वैद्यकीय अधिकारी, तुळजापूर) यांच्या हस्ते मा. सरपंच कुंभारी श्री. संतोष वडने, श्री .डॉ.दिनार उपासे समुदाय आरोग्य अधिकारी कुंभारी, यांचा ब्राँझ पदक व प्रमाण पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
तसेच उपकेंद्र स्तरावरील सिस्टर श्रीमती दूधभाते व आशा सौ. तांबे यांचे TB रोगाविषयी जनजागृती करून उत्तम काम केल्याबद्दल कौतुक करण्यात आले. ग्रामपंचायत कुंभारी येथील ग्रामस्थ, सरपंच, मेंबर यांच्या सहकार्यामुळे गावामध्ये जनजागृती करून सर्व्हे करू शकलो आणि सर्व ग्रामस्थ, सरपंच, मेंबर यांचेही कौतुक करण्यात आले.
0 Comments