धाराशिव तुळजापूर रोडवरील हॉटेल भाग्यश्री हॉटेलवर अज्ञातांकडून दगडफेक,७० हजार रुपयाचे नुकसान-
धाराशिव : हॉटेल भाग्यश्री... क्लॉलिटी विचारा अन् क्वाँटिटी विचारा... हॉटेल तिरंगा... नाद करती काय.. यावंच लागतंय! सोशल मिडिया ओपन केलं, की रील तुम्हाला दिसलेच समजा... गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही हॉटेल मालकांनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. रीलच्या माध्यमातून व्यवसायाची स्पर्धा दाखवणारे दोघांचेही रील चर्चेत असतात. अशातच हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड झाल्याची घटना रविवारी दिनांक आठ रोजी घडली. या घटनेत हॉटेल भाग्यश्रीचे बॅनर आणि बोर्ड फाडले गेले असून, सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली. त्यानंतर आता सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीसोबत तुफान स्पर्धा करणारे, हॉटेल तिरंगाच्या मालकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सोशल मीडियावर सुद्धा सध्या मराठी माणूस पुढे जाताना मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो अशा अशा तीव्र शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत.
हॉटेल तिरंगाच्या मालकाचा फुल सपोर्ट
''हॉटेल व्यवसाय उभं करणं खूप मोठी गोष्ट आहे. धाराशिव जिल्ह्याचं नाव आम्ही मोठं करतोय. भाग्यश्रीच्या मालकाला विनंती आहे की, खचून जाऊ नका. जिल्ह्याचं नाव आपण दोघेजण मोठं करु. भांडायचं तर समोरासमोर जाऊन भांडा, असल्या खोड्या करु नका.'' असं आवाहन हॉटेल तिरंगाच्या मालकाने अज्ञान हल्लेखोरांना केलं आहे.
0 Comments