Hot Posts

6/recent/ticker-posts

लाचखोर प्रकरणातील पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला पोलीस नाईक लोखंडे यांचे निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकाचे आदेश

लाचखोर प्रकरणातील पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला पोलीस नाईक लोखंडे यांचे निलंबन, विशेष पोलीस महानिरीक्षकाचे आदेश


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे  :  आत्महत्या प्रकरणातील गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच घेणाऱ्या लाचखोर पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी तातडीने निलंबित केले आहे. श्री वीरेन्द्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचे व मा. पोलीस अधीक्षक श्री. रितु खोखर यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके व महिला पोलीस नाईक  मुक्ता प्रकाश लोखंडे यांचेवर आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं 235/2025 कलम 7, 7(अ), 12 भ्रष्टाचार अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा दाखल असल्याने त्यांना आज दि. 27.06.2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments