तुळजापूर तालुक्यातील मोर्डा तडवळा ग्रामपंचायतीला टीबीमुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित
तुळजापुर /प्रतिनिधी रूपेश डोलारे :पंतप्रधानानी क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट २०२५ ला पूर्ण कराण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टीबी मुक्त अभियानातून तुळजापूर तालुक्यातील मोर्डा तडवळा या ग्रुप ग्रामपंचायतची टीबी मुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली आहे.
मोर्डा तडवळा येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेली जनजागृती व त्यावरील राबविलेल्या उपाययोजनाचे फलित म्हणून तालुक्यातील टीबी मुक्त होण्याचा मान आहे.
टीबीमुक्तग्रामपंचायतअंतर्गत मोर्डा तडवळा या ग्रुप ग्रामपंचायत ला दिनांक २६ रोजी उत्कृष्ट काम केल्याबद्दल ब्रांच मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार माननीय सरपंच ज्ञानेश्वर पांडागळे साहेब मोर्डा तडवळा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भिसे, आशाताई समा ताई बंडगर यांनी स्वीकारला.

0 Comments