तुळजापूर :संकल्प ते सिद्धी या अभियाना अंतर्गत तुळजापूर येथे वृक्षारोपण व जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचचे उदघाटन सोहळा संपन्न
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे : संकल्प ते सिद्धी या अभियाना अंतर्गत तुळजापूर येथे वृक्षारोपण व जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचचे उदघाटन जिल्हा अध्यक्ष मा दत्ताभाऊ कुलकर्णी, मा नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, मंडल तालुका अध्यक्ष आनंद दादा कंदले, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रस्तावनात बोलताना अभियानाचे प्रमुख शिवाजी बोधले नरेंद्रजी मोदी यांच्या अभियान एक पेड अपने मा के नाम या आवाहणाला प्रतिसाद देत वृक्षारोपण केले व जेष्ठ नागरिकांना बसण्या साठी बेंच ठेवले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतं आहे ;असे अनेक उपक्रम तुळजापूर शहरात प्रत्येक प्रभागात घेण्यात येणार आहेत असे शिवाजी बोधले म्हणाले. यावेळी सभापती सचिन भैय्या पाटील,प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे संकल्प ते सिद्धी तक या अभियानाचे संयोजक शिवाजी बोधले, सावरकर विचार मंच चे अध्यक्ष बाळासाहेब शामराज, उमेश गवते, महेश गरड, महेश कुलकर्णी, सतिश महामुनी,प्रा विलासराव जगदाळे, पत्रकार अंबादास पोफळे,गिरीश देवळालकर,मोर्डा तडवळा चे सरपंच न्यानेश्वर पांडागळे, दिनेश क्षीरसागर, बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, धैर्यशील दरेकर,दिनेश बागल, ऋषिकेश साळुंके, सागर पारडे, सागर कदम, सचिन आप्पा रसाळ, प्रमोद दाणे, राम चोपदार, आप्पा पवार प्रशांत रत्नपारखी, नरसिंग वाळके,कुबेर जाधव आधी सह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
0 Comments