मौजे लोहगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ ( दिनेश सलगरे):- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहगाव येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातून विविध भागातील कलाकारांनी हजेरी लावली प्रथम अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , हिंदी मराठी रिमिक्स लोकगीत लावणी अशा विविध गाण्याने स्पर्धकांनी आपल्या कलाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली
यामध्ये बालघट समूह गट वैयक्तिक गट असे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सांगता होताच रोख रक्कम पारितोषिक व सन्मान चिन्ह स्पर्धकाला देण्यात आले
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमनाथ गुड्डे प्रमुख पाहुणे म्हणून वंचितच्या नेत्या स्नेहा सोनकाटे उपस्थित होत्या.कार्यक्रमासाठी सरपंच प्रवीण पाटील उपसरपंच प्रशांत देशमुख ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ दबडे , अश्विनी बनसोडे, माळाप्पा बंदीछोडे माजी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख लोकसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मेहबूब शेख गावातील माजी सरपंच सुनील बनसोडे, शालेय समिती शिक्षण समिती अध्यक्ष राहुल शेंडगे उपाध्यक्ष आप्पाराव होळे, पोलीस पाटील शिवानंद पाटील डॉ संतोष कलकुटे डॉ, अनंत काटकर
संजय खताळ बसवराज सुरवसे रविकांत शिंगाडे उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन शेंडगे उपाध्यक्ष गजानन शेंडगे, सचिन शिंगाडे आकाश बनसोडे योगेश वाघमोडे अक्षय पाटील केशव बनसोडे प्रवीण बंडगर उत्सव समिती मधील सर्व सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले परीक्षक म्हणून श्री माळी सर व श्री पाठक सर यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.
0 Comments