नांदेड: फेसबुकवर प्रेम रंगले अन् विवाह बंधनात अडकले प्रेमीयुगल
नांदेड: प्रेम कधी कोणासोबत होईल हे सांगता येत नाही प्रेमाला जात धर्म नसते कितीही दुरून एखाद्यावर प्रेम होऊ शकते. नांदेड जिल्ह्यातील एका अपंग तरुणीची नांदेड जिल्ह्यातील बल्लाळ येथील आटो चालक तरुणांसोबत फेसबुक वर ओळख झाली आणि हळूहळू प्रेम भरत फुलत गेलं येथील ऑटोचालक तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली आणि हळूहळू प्रेम भरत फुलत गेलं दोघीही एका जातीचे तिच्या हातापायाची बोटी थोडीशी अपंगत्व असतानाही तिच्या हातात हात देण्याचे धाडस संदेशने केलं. रायगडची सीमा ओलांडून आईला सोबत घेऊन सीमाने बल्लाळ गाठले आणि दोघे विवाह बंधनात अडकले.
भोकर तालुक्यातील डोंगर माळ रानात असलेल्या बल्लाळ या छोट्याशा गावातील सुरेश अमृता हिरे यांचा मुलगा संदेश हिरे व रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील श्रीराम मोरे यांची मुलगी सीमा यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली नांदेड जिल्ह्यातील बल्लाळ व रायगड जिल्ह्यातील कर्जत हे अंतर खूप दूर असले तरी फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून दोघे एकत्र आल दोघांचे एकमेकावर मन जडलं प्रेम शेवटी प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं या कवितेच्या ओळीस अभिप्रेत असलेल्या दोघांनी साथ देंगे साथ मरेंगे ची शपथ घेऊन दोघेही विवाह बंधनात अडकले. दोन्हीकडच्या कुटुंबियांनी सहमती दिली मुलगा संदेश हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांचा पत्नी आहे हिरे यांनी या दोघांची विचारपूस केली मुलींच्या आई-वडिलांना आम्ही ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील आहोत पुढे चालून संसार टेकणी महत्वाची आहे तेव्हा मोरे कुटुंबीयांनी आमच्या मुलीची पसंती असेल तर आमचे काही एकही म्हणणे नाही म्हणून सहमती दर्शवली सीमानेही लग्न करूनच माहेरी जाण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा जुळवाजवळ करून लग्नाची तारीख निश्चित केली दिनांक 25 मे 2025 रोजी बल्लाळ तालुका भोकर येथे बनते धम्मानंद यांच्या हस्ते मंगल परिणय संस्कार थाटात संपन्न झाला विवाह सोहळ्यास भोकरचे जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव दंडवे ओबीसी बहुजन नेते नामदेवराव आईलवाड ,नंदकुमार कौस्तुभवावर ,भीम शाहीर साहेबराव येरेकर ,नागोराव शेंडगे ,शाहीर बाबुराव गाडेकर माजी नगरसेवक डॉक्टर मनोज जिमेकर पांचाळ लक्ष्मण पाटील दत्ता डोंगरे लक्ष्मणराव झाडे आनंद ढोले देविदास गडपळे सर सामाजिक राजकीय पदाधिकारी पत्रकार महिला पुरुष व अनेक मान्यवर असं मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
0 Comments