/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे योगशिबिर; भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात आयोजन

Hot Posts

जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे योगशिबिर; भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात आयोजन

जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे योगशिबिर; भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात आयोजन


धाराशिव - जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव येथील भाजपा जिल्हा कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे शुक्रवार, २१ जून रोजी योगशिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. नितीन भोसले, ॲड. अनिल काळे, डॉ.गोविंद कोकाटे, ॲड.खंडेराव चौरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. योग सत्राचे मार्गदर्शन युवराज नळे यांनी केले. कार्यक्रमात प्राणायाम, सूर्यनमस्कार, विविध आसने आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. योग केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता देणारा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>