Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : सेवानिवृत्त १० अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न.

धाराशिव : सेवानिवृत्त १० अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न.”


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव शहर पोलीस दलातील अधिकारी- पोलीस उपनिरीक्षक श्री. मुसा महेबुब शहा, व श्रेणी पोलीस उप निरीक्षक श्री. श्रीनिवास संभाजी घुगे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक- श्री.दिनकर किसनराव खाडे,गुलजार खानम. इब्राहिम खान पठाण, सुरेश बापुराव चव्हाण, पोलीस सहाय्यक फौजदार- श्री. शाहुराज देवराव ओव्हाळ, पोलीस हावलदार जमील महमंद हनीफ मोमीन, सुदाम जोतीराम दुधंबे, भारत दत्तु शिंदे, पोलीस अंमलदार- महादेव रामा कांबळे या 10 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 30.06.2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.


या निरोप समारंभादरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सपोनि कोळेकर यांनी केले. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, पोलीस उप अधिक्षक मुख्यालय- मनिष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक- कोळेकर, चास्कर भिंगारे, कासुळे व अधिकारी अंमलदार उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments