प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांचे काम कळसापर्यंत घेऊन जाणारे आहे- कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे
_____________________________
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांना परमेश्वर मानून त्यांची आराधना केली.बापूजींनी उभारलेल्या प्रत्येक संस्कार केंद्रावर आपत्याप्रमाणे प्रेम केले.आणि त्या मराठवाड्यातील संस्कार केंद्राचा सर्वांगीण विकास करण्याचे काम प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे. असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी 28 जून 2025 रोजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या सेवा समारंभात केले. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हा सेवा गौरव समारंभ पार पडला.पुढे ते म्हणाले की, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सर्व संस्कार केंद्राचा विकास घडवून आणला. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असताना त्यांनी ते काम कळसापर्यंत घेऊन जाण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.सुरुवातीला प्राचार्य कणबरकर,प्राचार्य वेदालंकार,प्राचार्य जगताप,प्राचार्य दापके ,यांनी देखील महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केला.या सर्व प्राचार्यांनी महाविद्यालयाचा पाया म्हणून भूमिका बजावली तर प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी महाविद्यालयाचा विकास काळसापर्यंत घेऊन जाण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
प्राचार्य डॉ.देशमुख यांच्या गौरव समितीचे अध्यक्ष म्हणून श्री नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले, त्या प्रास्ताविकात ते म्हणाले की, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी महाविद्यालयाच्या विकासात मोलाची भर घातली.मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना विभागातील सर्व शाखा विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. कार्य किती दिवस केली आहे ? यापेक्षा कसे केले आहे? हे महत्वाचे आहे. त्यांनी अनेक विकासात निर्णय घेतले व ते पूर्ण केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे म्हणाले की,प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी बापूजींनी दाखवलेल्या वाटेवरून चालताना सुसंस्काराबरोबरच भौतिक विकासाची खूप मोठी कामे केली आहेत. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा विचार केल्यास या महाविद्यालयात कनिष्ठ विभागाची इमारत, नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम , विविध विषयांची संशोधन केंद्र,माती परीक्षण केंद्र, नाविन्यपूर्ण प्रवेशद्वार , अंतर्गत रस्ते,याच परिसरातील दोन महाविद्यालयांना डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आणि श्रीमती सुशीलादेवी कॉलेज ऑफ एज्युकेशन असे नामकरण त्यांनी त्यांच्या काळात करून घेतले , नॅक मध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाला ए दर्जा मिळवून दिला. इत्यादी विविध भौतिक स्वरूपाची कामे, आणि शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याची महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केली आहेत.
जयोगाथा या गौरव ग्रंथाचे संपादक म्हणून मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख म्हणाले की, या गौरव ग्रंथासाठी एकूण 106 लेख प्राप्त झाले. या लेखाचे संपादन करत असताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या कामाची व्याप्ती खूपच मोठी असल्याचे दिसून आले.
याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यावेळी खासदार निंबाळकर म्हणाले की, जेव्हा शैक्षणिक आणि शासकीय कामे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी आम्हाला सांगितली तेव्हा ही संस्था आम्हाला परकी वाटली नाही.आपल्याच घरातील एक संस्था आहे असे समजून आम्ही आमच्या परीने मदत केली आहे यापुढे देखील आम्ही अशीच मदत करू असे ते यावेळी म्हणाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र .कुलगुरू प्रो .डॉ.वाल्मीक सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदर्श प्रशासक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होय. असे प्रतिपादन केले.
आमदार कैलास दादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की,प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि कडक शिस्त हे समीकरणच जुळलेले होते.कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
मतदार संघाचे आमदार विक्रमजी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे चालते बोलते विद्यापीठ आहे.त्यांचा आम्हा धाराशिवकरांना अभिमान आहे. असे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांची पुतणी कु.डॉ.किरण देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे आमचे आदर्श आहेत.महाविद्यालय ते कडक शिस्तीचे प्राचार्य म्हणून कार्यरत असले तरी आमच्यासाठी ते खूप मायाळू आणि प्रेमळ आहेत.
प्राचार्य देशमुख यांची द्वितीय पुतणी डॉ.प्रियांका देशमुख-बाहेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले ,त्यावेळी त्या म्हणाल्या की, इतर लोकांकडून काकांची कामगिरी ऐकल्यानंतर मला त्यांचा अभिमान वाटत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्ष कुमारी सक्षणा सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी त्या म्हणाल्या की,प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही पोकळी भरून निघणे अशक्य आहे.
प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यावेळी ते म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे या महामानवाचे मराठवाड्यावर खूप मोठे उपकार आहेत. आज मराठवाड्यातील अनेक संस्कार केंद्रामधून खूप मोठे विद्यार्थी घडले आहेत. अनेकांच्या चुली पेटल्या आहेत. मी देखील खूपच सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्यामुळे शिक्षण घेतले आणि याच संस्थेमध्ये 50 वर्षाचे माझे स्नेहसंबंध जुळले. माझ्या नोकरीची सुरुवात ही कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्यामुळे झाली. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून कार्यकरत असताना मी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाबरोबरच सर्व संस्कार केंद्राचा सर्वांगीण विकास करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण समित्यांवर काम करताना मी धाराशिव येथील उपकेंद्र व महाविद्यालयासाठी खूप मोठा निधी मिळवून देण्याचे कार्य केले. रामकृष्ण परमहंस विद्यालयाला डीबीटी स्टार महाविद्यालयाचा दर्जा आणि नॅक मध्ये महाविद्यालयाला सर्वाधिक सीजीपीए सह ए दर्जा मिळवून दिला याचा मला मनस्वी समाधान वाटते.हे सर्व कार्य मी संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या आई-वडिलांच्या संस्कारामुळे करू शकलो.
याप्रसंगी जयोगाथा या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले व याचवेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांची पुस्तकासमवेत तुला करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचा गौरव समिती मार्फत सपत्नीक सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर प्रा. शिवाजीराव भोसले यांचा देखील सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांना गौरव समितीकडून देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले.
या कार्यक्रमात जयसिंगराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित प्रा. डॉ. मारुती लोंढे व प्रा. गणेश शिंदे यांनी तयार केलेली चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली.
यावेळी विचार मंचावर महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य बाळासाहेब शिंदे ,जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे उपस्थित होते.
यावेळी विचार मंचावर,शिक्षक मतदार संघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण,विश्वास आप्पा शिंदे,श्री एम डी देशमुख,प्राचार्य डॉ.सौ. सुलभा देशमुख ,प्राचार्य डॉ.रमेश दापके ,संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्रा.डॉ. सौ.विद्या देशमुख इत्यादी विचार मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैभव आगळे व आकाशवाणीचे निवेदक दौलत निपाणीकर यांनी केले , तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.संदीप देशमुख यांनी मानले.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
0 Comments