सारिका ताई कांबळे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार जाहीर, नवी दिल्ली येथे होणार पुरस्कार प्रदान सोहळा
धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा गौरव पुरस्कार जहागीरदारवाडी लहुजी शक्ती सेना धाराशिव जिल्हा अध्यक्ष तसेच सामाजिक चळवळ चळवळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या सौ सारिका ताई कांबळे यांना जाहीर झाला असून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन यावर्षीचा प्रतिष्ठेचा गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी इंडिया गेट जवळ नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले साधुसंत महंत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निलेश गद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याचे जयंती समितीचे अध्यक्ष विनोद धर्म जाधव यांनी सांगितले.
0 Comments