पुणे येथील दोन वर्षीय चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपीस तुळजापुरातून ठोकल्या पोलिसांनी बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धाराशिव/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण (kidnap)करणाऱ्या टोळीस नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur)येथून चिमुरडीची सुखरूप सुटका करत टोळीतील तीन जणांना अटक केली असून, यात एका महिलेचाही समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे भारती विद्यापीठ पुणे(police Station Bharati vidyapith) शहर येथील पोउपनि श्री. निलेश मोकाशी यांनी फोनवरून कळविले की, दोन दिवसापुर्वी पोलीस ठाणे भारती विद्यापीठ हद्दीतुन एका 02 वर्षाच्या मुलीचे उपहरण केलेले आहे. सदर मुलगी व आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत तुम्ही पण माहिती घ्या असे कळविलेवरुन पथकाने माहिती घेत असताना पथकास गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तुळजापूर येथील सुनिल सिताराम भोसले व त्याचे साथीदार यांनी पुणे येथुन एक दोन वर्षीची मुलगी अपहरण(kidnapcase) करुन आणली आहे. त्यावरुन पथकाने लागलीच तुळजापूर येथे जावून सुनिल सिताराम भोसले, यास ताब्यात घेवून पथकास मिळालेल्या माहिती बद्दल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की शंकर उजण्या पवार, शालुबाई प्रकाश काळे व मी असे आम्ही तिघांनी मिळून पुणे येथुन एक अंदाजे दोन वर्षाची मुलगी घेवून आलो आहोत. व ती मुलगी शंकर उजण्या पवार याचेकडे हासेगाव ता. जि. लातुर येथे आहे असे सांगीतल्याने आम्ही लागलीच हासेगाव ता. जि. लातुर येथे गेलो असता तेथे शंकर उजण्या पवार व शालुबाई प्रकाश काळे मिळून आले. त्यांचे ताब्यात अपहरण करुन आणलेली अंदाजे 02 वर्षाची मुलगी मिळून आली. पथकाने आरोपी नामे- सुनिल सिताराम भोसले, वय 51 वर्षे, रा. तुळजापूर ता.तुळजापूर जि. धाराशिव, शंकर उजण्या पवार, वय 40 वर्षे, रा. तुळजापूर ह.मु. हासेगाव ता.जि. लातुर, शालुबाई प्रकाश काळे, वय 35 वर्षे, रा. तुळजापूर ता. तुहजापूर जि. धाराशिव व अपह्रात मुलगी नामे कोमल धनसिंग काळे, वय 02 वर्षे, यांना पुढील कायदेशीर कारवाई कामी पोउपनि श्री.निलेश मोकाशी व मपोअं/10902 डुकरे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना(प्रभारी पोलीस अधीक्षक), यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोह/ महेबुब अरब यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments