Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे खुदावाडी येथे सत्संग संतांचा पंधरवडा बैठक मार्गदर्शन करताना हभप. अशोक जाधव गुरूजी बाभळगावकर

मौजे खुदावाडी येथे सत्संग संतांचा पंधरवडा बैठक मार्गदर्शन करताना   हभप. अशोक जाधव गुरूजी बाभळगावकर


तुळजापुर:  तालुक्यातील मौजे खुदावाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे सत्संग संतांचा या बैठकीचे आयोजन ह भ प डॉक्टर श्री विष्णुपंत मुंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली  तसेच ह भ प श्री जोडभावे सर यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली.

 प्रारंभी ह भ प श्री आबासाहेब जाधव व ह भ प श्री शिवाजीराव चव्हाण महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर श्री ह भ प जोडभावे सर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. यानंतर ह भ प श्री दिनेश जी सलगरे सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तदनंतर ह भ प श्री शिवाजीराव चव्हाण महाराज यांनी स्व स्वरूपाचे ज्ञान व अध्यात्मज्ञान याच्यावर सविस्तर विवेचन केले यानंतर ह भ प आबासाहेब जाधव ह भ प श्री आकाश पाटील तसेच दिनेश जी सलगरे सर कुमारी करपे ताई अभिमन्यू शिंदे ह भ प सदाफुले महाराज इत्यादी सर्वांनी विवेचन केले तसेच ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांनी सद सद्यस्थितीतील परमार्थ या विषयावर विवेचन करून उत्कृष्ट असे प्रवचन केले .तर नंतर ह भ प श्री जोडभाव  सर यांनी प्रवचन केले तसेच ह भ प श्री विष्णुपंत मुंडे महाराज यांनी सत्संग संतांचा कशासाठी सुरू केला याची रूपरेषा सांगितली. तसेच श्री शिवाजीराव सुरवसे सर ह भ प सोमवंशी सर इत्यादी सर्वांनी आपापले विचार मांडले शेवटी सर्वांचे आभार ह भ प श्री जोडभावे सर यांनी मांडले अशा पद्धतीने भोजनानंतर सत्संग संतांची बैठक संपन्न झाली.


Post a Comment

0 Comments