Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वेत नोकरीच्या आमीषाने तरुणाची 24 लाखांची फसवणूक खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग मेडिकल प्रक्रियेचा बनाव चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल

 रेल्वेत नोकरीच्या आमीषाने तरुणाची 24 लाखांची फसवणूक खोटे नियुक्तीपत्र, ट्रेनिंग मेडिकल प्रक्रियेचा बनाव चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल


परळी(बीड) प्रतिनिधी -रूपेश डोलारे  :   रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून नियुक्तीपत्र, ट्रेनिंग मेडिकल अशी सर्व प्रक्रिया पार पडल्याचे भासवत परळी येथील 21 वर्षीय  महादेव भरत मुंडे या युवकाची तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जनाविरुद्ध येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की महादेव मुंडे यांचे शिक्षण सुरू असून ते कुटुंबासमवेत पंचशील नगर परळी येथे राहतात नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांचे वडिलांचे ओळखीचे असलेले काशिनाथ भानुदास घुगे (राहणार शिवाजीनगर परळी) यांनी त्याला रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे सांगून विश्वासात घेतले 5 डिसेंबर 2023 रोजी ते महादेवाला दिल्लीला घेऊन गेले व तेथे त्याचे मेडिकल करण्यात आले. यानंतर सचिन नारायण वंजारी राहणार परळी यांच्या खात्यावर दोन दिवसात एकूण 1 लाख रुपये पाठवण्यात आले. त्याच्या मोबदल्यात महादेवला रेल्वेच्या गेटमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिले गेले पुढे अमृतसर येथे जाऊन ट्रेनिंगची प्रक्रिया सुरू झाली ; परंतु नंतर रेल्वे कॉर्टर मिळवण्यासाठी आणखी तीन लाख रुपये मागविण्यात आले. महादेवच्या वडिलांनी आपल्या खात्यातून 90 हजार रुपये काशिनाथ यांना पाठवले अमृतसर येथे सुरत सिंग नावाच्या इसमाशी संपर्क करून गेट क्रमांक 26 वर ट्रेनिंग सुरू झाली. पुढील टप्प्यात महादेव कडून संजय ठाकूर , मनीष यादव, एस के सिंग या व्यक्तींनी वेळोवेळी संपर्क करून 50 हजार ते सहा लाख रुपये पर्यंतची रक्कम मागून घेतली  याशिवाय महादेवच्या मामाकडून आणि आजोबांकडून त्याच्या चुलत मामासाठी टीसी पदावर नोकरी लावण्यासाठी तब्बल  14 लाख 70 हजार रुपये उकळण्यात आले .यातून काही रक्कम सुद्धा महादेवच्या खात्यातून वडिलांच्या खात्यातून प्रेम कुमार यांच्या खात्यावर पाठवली अशी तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणामुळे परळी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खोट्या ऑर्डरचा असा झाला परदाफास

महादेव चे चुलत मामा दिल्लीतून मिळालेली नियुक्तीपत्र घेऊन CSTM येथे DMR ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठी गेले मात्र तेथील अधिकाऱ्यांनी ही ऑर्डर बनावट असल्याचे स्पष्ट केल्यावर सर्व प्रकाराची पोलखोल झाली.

संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

या सर्व प्रकारानंतर महादेव मुंडे यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून काशिनाथ घुगे ,सचिन वंजारी दोघे राहणार परळी वैजनाथ संजय ठाकूर (राहणार दिल्ली) सुरज कुमार सिंग (अमृतसर पंजाब) या चौघाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम तीन पाच 342 (2) 340 (2) 336 336 (2) 316 (2) 318 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments