तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील शेतकरी नेते ज्ञानेश्वर साळवे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे : तालुक्यातील मसला खुर्द येथील श्री ज्ञानेश्वर साळवे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर साळवे यांनी शेतकऱ्यांसाठी राज्याच्या मंत्रालयासमोर अनेक आंदोलन केले आहेत त्यामुळे ज्ञानेश्वर साळवे यांच्या निवडीमुळे शेतकऱ्यांमध्ये व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी व सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम व काँग्रेसची विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर साळवे यांनी केले. ज्ञानेश्वर साळवे यांच्या निवडीने मराठवाडा व धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व स्तरातून निवडीचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments