समाजाचा मजबूत कणा म्हणजे प्रामाणिक पत्रकारीता: - नानासाहेब जावळे -पाटील
-------------------------------------------
उमरगा/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : महाराष्ट्र रफ्तार न्यूज मराठी चॅनल च्या प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय छावा संघटेनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील हे होते.आजच्या काळात पत्रकारीता करणे म्हणजे काट्यावरची कसरत आणि खूपच जोखमीचे काम.कुणाला कुठे ठेवायचं काम प्रामाणिक पत्रकारच करू शकतो.सर्वधर्म समभाव जोपसणारे हे न्यूजचॅनल आहे असे प्रतिपादन जावळे पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांना "महाराष्ट् समाजरत्न गौरव"पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील कु.कस्तुरी प्रशांत मस्के या चार वर्षांच्या मुलीला ही पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष रझाक अत्तार, उद्योजक प्रदिप पाटील, पोलिस पाटील प्रशांत पाटील,प्रा.शौकत पटेल, उद्योजक अजीत पाटील,अ.भा.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष महावीर पाटील, ज्ञानेश्वर पाटील,बाळू कारभारी, संजय राठोड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र रफ्तार न्यूज मराठी चॅनल चे संपादक राहील पटेल यांनी केले.सूत्रसंचालन युवराज गायकवाड तर आभार बाळासाहेब माने यांनी मांडले.
0 Comments