संतापजनक : मोटरसायकलवर बसून नेऊन जीवे ठार मारण्याचे धमकी देऊन ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर तरुणांकडून लैंगिक अत्याचार
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : भूम तालुक्यातील एका गावातील तरुणांनी गावातीलच एका 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मोटरसायकलवर बसून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील एका गावातील 70 वर्षे महिलेला दिनांक 20 जुलै रोजी रात्री सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान गावातीलच एका तरुणाने मोटरसायकलवर बसवून घेऊन जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच या महिलेला सोयाबीनच्या शेतात घेऊन जाऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिनांक 30 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरी वरून भारतीय न्याय संहिता कलम 64,351 (3) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments