खळबळजनक घटना: दुसऱ्या लग्नासाठी आईनं चक्क पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला १० हजारांना मूल विकलं? धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे : पतीच्या आत्महत्येनंतर आपल्या अडीच वर्षीय बाळाला १० हजार रुपयांत नोटरीवर दत्तक विधान करून देत महिलेने दुसऱ्याशी संसार थाटल्याची घटना शनिवारी धाराशिवमध्ये उजेडात आली. बालकल्याण समितीने या बाळास शिशुगृहात दाखल केले असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ,पहिल्या पतीपासून झालेले मुल नकोसे असल्यामुळे त्या मुलाला दहा हजारात विकून आईनेच पलायन केल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील मुरूम येथून उघडकीस आली आहे. एक वर्षाच्या त्या चिमुकल्याला चक्क बॉण्ड पेपर वर लिहून देत दहा हजार रुपयांना विकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चिमुकल्या मुलाच्या आज्जीने मुलगा आणि सून हरवल्याची तक्रार दिल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तसेच यामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उडी घेऊन या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,मुरूम येथील एका महिलेने त्यांची सून आणि एक वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.ही घटना काही सामाजिक कार्यकर्त्यांना देखील समजली होती. त्यानंतर तक्रार देणाऱ्या आज्जीच्या मदतीने आई आणि मुलगा यांचा शोध घेतला असता. आईनेच छोट्या मुलाला सोलापूर येथे दहा हजार रुपयांना विकून दुसऱ्या नवऱ्यासोबत पलायन केले असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे बॉण्ड वर लिहून देऊन एक वर्षाच्या चिमुकल्याची विक्री केल्याचे उघड झाले.यानंतर मुरूम येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज्जीला सोबत घेऊन सोलापूर येथून विक्री केलेल्या लहान मुलाला ताब्यात घेतले. तसेच त्याला बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले . मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.मुरुम येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आजीला सोबत घेऊन सोलापूर येथून मुलाला ताब्यात घेतले. चिमुकल्याला धाराशिव येथील जिल्हा बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
आजीच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
महिलेच्या सासूने नातवाचा ताबा मिळावा, म्हणून महिलेच्या माहेरी चौकशी केली असता, बाळ व महिला दोघेही तेथे नसल्याचे समजले. त्यामुळे सासूने पोलिसात तक्रार केली. यानंतर मुंबईच्या दामिनी व बीड येथील निर्धार स्वयंसेवी संस्थेच्या पाठपुराव्याने पोलिसांनी बाळाचा पत्ता शोधला. संबंधित कुटुंबाकडून बाळ ताब्यात घेऊन त्यास २४ जुलै रोजी धाराशिवच्या बालकल्याण समितीकडे दाखल केले.
मुलाच्या ताब्यावरून झाला वाद :
नोटरीवर दत्तक विधान करून घेतलेले कुटुंब व मुलाची आजी शनिवारी ताब्यासाठी धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, नोटरीवर दत्तक विधान कायदेशीर नसल्याने बाळाचा ताबा सोलापूरच्या कुटुंबास मिळू शकत नसल्याचे बालकल्याण समितीने स्पष्ट केले आहे.
0 Comments