लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना -
धाराशिव/प्रतिनिधी -रूपेश डोलारे : माझे तुझ्यावर प्रेम असून लग्न करणार असल्याचे अमिष दाखवत एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नळदृग पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील घटना आहे . माझे तुझ्यावर प्रेम आहे तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फोन करून आपल्या घरात बोलावत तिच्यावर गावातीलच एका तरुणाने बळजबरीने अत्याचार केला ही घटना दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 मे 2025 दरम्यान नळदुर्ग पोलिस ठाण्याचे हद्दीतील एका गावात घडली आहे या प्रकरणात पिडीतिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावातील एका तरुणाने तिला फोनवर संपर्क साधत तू मला फार आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणत तिला घरी बोलावून घेतले त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले असे फिर्यादीत नमूद केले आहे याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना कळंब तालुक्यातील शिरढोण पोलीस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शिरढोण पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात वीस वर्षीय विवाहितेचे बाथरूम मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे तसेच पतीला पाठवण्याची धमकी देत दोघा तरुणांनी तिच्यावर अत्याचार केला ही घटना 9 मे ते 14 जुलै 2025 दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरोढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील 20 वर्षीय विवाहितेस गावातीलच दोन तरुणांनी तुझी बाथरूम मधील फोटो पतीला पाठवतो अथवा सोशल मीडियावर व्हायरल करतो असे धमकावत बळजबरीने दुसऱ्यावर बसून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला याप्रकरणी आरोपीविरुद्ध शिरोढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments